संत वामनभाऊ गड जमदारवाडी येथे भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन…

- Advertisement -spot_img

संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमदारवाडी येथील गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील संत वामनभाऊ गड येथे सालाबाद प्रमाणे या वर्षही भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा दिनांक २२ जानेवारी रोजी होणार आहे प्रारंभ.


       महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांच्या किर्तन सेवा संपन्न होणार आहेत दररोज सात नऊ किर्तन व नंतर सर्व भाविक भक्तांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
  
     जामखेड तालुक्यातील जमदारवाडी सारोळा रोड लगत संत वामनभाऊ महाराज यांचे मंदिर आहे समोर भव्य असे प्रांगण सभोवताली झाडी आशा निसर्गरम्य वातावरणात मंदिर परिसरात पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा प्रमाणावर दर्शनासाठी येत आसतात याच मार्गाने भाऊ दिंडी घेऊन पंढरपूरकडे जात होते आणि आजही ती परंपरा महंत विठ्ठल महाराजांच्या नेतृत्वात सुरू श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडीचे एकमेव गोल रिंगण संत वामनभाऊ गड जमादारवाडी येथे संपन्न होते ते पाहाण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी गडावर होत आसते.

     संत वामनभाऊ महाराज यांनी आज्ञानी समाजाला जागृत करून जीवाच्या उध्दारासाठी भक्तीचा मार्ग दाखवला तसेच अडाणी समाजाला शिक्षणाची वाट दाखविली राज्यभर फिरून नारळी सप्ताह सुरू केले

भाऊंच्या पुण्यतिथी निमीत्त जमदारवाडी येथील गडावर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे गेली आनेक वर्षे आयोजन करण्यात येते
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम
सकाळी ४ते ६ काकडा भजन,६ते७ महापुजा ७ते१० ज्ञानेश्वरी पारायण दुपारी ११ ते १गाथा भजन सायंकाळी ४ते ५ प्रवचन ५ते ६ हरिपाठ ७ते ९ हरिकिर्तन व त्यानंतर सर्वांसाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी आणलेल्या भाकरी भाजीची महापंगत दररोज किर्तनानंतर होणार आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा