जामखेड येथे भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

- Advertisement -spot_img

या स्पर्धेतून मोठमोठे स्पर्धक निर्माण व्हावेत यासाठी खेळाडूंनीही जिद्द, चिकाटी ठेवून सातत्याने प्रयत्न करावेत : : बबन (काका) काशिद

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुका खेळाची उणीव असलेला तालुका आहे. या तालुक्यात खेळासाठी कोणत्याही सोईसुविधा किंवा खेळाडू तयार होतील असे वातावरण नाही. तालुक्याचे भुमीपुत्र असलेले उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद यांनी गेल्या पाच वर्षांपासून जामखेड येथे सुरु केलेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेमुळे तालुक्यात खेळाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. त्यानुसार याच स्पर्धेमुळे तालुक्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरापर्यंत पोहचून ऑलिंपिक पर्यंत पोहचतील अशी अपेक्षा व्यक्त करणे संयुक्तीकच ठरेल. त्याचबरोबर तालुक्यातील खेळांडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई सुवर्ण पदक विजेते पै. सुजय तनपुरे यावर्षी स्वामी विवेकानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन त्यांच्याकडूनही तालुक्याला मोठ्या अपेक्षा आहेत. असे प्रतिपादन जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज दि. १२ जानेवारी रोजी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेनंतर झालेल्या बक्षिस व पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात

, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे आयोजक व मल्लविद्या कुस्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, आशियाई सुवर्ण पदक विजेते पै. सुजय तनपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, डॉ. कल्याण काशिद,उद्योजक अकाश बाफना प्रफुल्ल सोळंकी, देविचंद डोंगरे, अॅड. हर्षल डोके, डॉ. पांडुरंग सानप, अमित जाधव, आप्पा शिरसाठ, निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे, शिंदे सर, सुदर्शन चव्हाण, विठ्ठल देवकाते, गफ्फार पठाण, मयुर भोसले, विजय काशिद, सुग्रीव ठाकरे, रमेश बोलभट, किशोर सातपुते, त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सारोळा शाळेचे सर्व शिक्षक, माध्यमिक शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्पर्धेचे आयोजक व मल्लविद्या कुस्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बबन काशिद म्हणाले की, या स्पर्धेतून पुढील काळात मोठमोठे स्पर्धक निर्माण व्हावेत यासाठी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यासाठी जामखेडकरांचेही सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. मात्र खेळाडूंनीही यासाठी जिद्द, चिकाटी व सातत्याने प्रयत्न करून आपले, कुटुंबाचे व तालुक्याचे नाव कसे उंचावले जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर ही स्पर्धा आयोजित केल्याचे सार्थक होईल

गेली पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा याही वर्षी दि. १२ जानेवारी २०२५ रोजी जामखेड येथे संपन्न झाल्या असून जामखेड शहरातील खर्डा चौकातील उर्दु शाळेपासून सकाळी ७: ०० वाजताच्या सुमारास

मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात तसेच समारोपही त्याच ठिकाणी झाला. यानंतर झालेल्या बक्षिस समारंभात यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रशिस्तीपत्रक देण्यात आले.

आशियाई सुवर्ण पदक विजेते मिळविले बद्दल पै. सुजय तनपुरे यांना स्वामी विवेकानंद युवक पुरस्कार व मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कॅप्टन लक्ष्मण भोरे, शोभा कांबळे, आकाश बाफना यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक खालील प्रमाणे

प्रथम अंकुश हाके (सांगली) 21000 रु वेळ 1 तास 6 मी.,

द्वितीय ओंकार आव्हाड (आष्टी) 11000रु वेळ 1 तास 15 मी.,

तृतीय – संमेक राजगुरू (पाथर्डी) 7000 रु. वेळ 1 तास 24 मी, चौथा दीपक पवार (पाथर्डी) 5000 रु वेळ 1 तास 30 मी पाचवा सुजित पाटील (सांगली) 3000रु वेळ 1 तास 35 मी. 11 किमी खुला गट महिला प्रथम प्रिया गुळवे (पारनेर) 11000 रु, द्वितीय आरती बाबर (सातारा) 7000 रु तृतीय सुरेखा मातने (पुणे) 5000 रु चौथा अंजली काळेल (सातारा) 3000 रु पाचवा अश्विनी हिरडे (अ. नगर) 2000 रु 5 किमी सोळा वर्षाच्या खालील मुले प्रथम ओंकार भुसनर (सांगली) 5000 रु, द्वितीय सुरज खोत (सांगली) 3000रु तृतीय ओंकार राठोड (धाराशिव) 2000 रु 5 किमी सोळा वर्षाच्या खालील मुली प्रथम वैभवी खेडकर (अहिल्यानगर) 5000 द्वितीय समृद्धी जाधव (पारनेर) 3000 रु तृतीय प्रणिता हीकरे (अहिल्यानगर) 2000 वरिष्ठ गट 50 वर्षांपुढील पुरुष 4 किमी प्रथम डॉ पांडुरंग सानप (जामखेड) 5000 रु, द्वितीय बबन नाईक (जामखेड) 3000रु तृतीय आप्पा शीरसाठ (जामखेड) 2000 रु बाल गट 10 वर्षा खालील 2 किमी प्रथम आयुष जाधव (पारनेर) 3000 रु, द्वितीय सार्थक वीर (जामखेड) 2000 रु तृतीय मयुरी मुळे (सारोळा) 1000 रु वरिष्ठ गट महिला 4 किमी प्रथम झरकर मनीषा (जामखेड), द्वितीय शोभा कांबळे (जामखेड) तृतीय भाग्यशी कोळी (जामखेड) विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल सन्मान चिन्ह, रोख रक्कम चेक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सांगलीचा अंकुश हाके याचे वर्ल्ड चॅम्पियन मॅरेथॉन स्पर्धेसाठी साठी निवड झालेली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा