जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील स्वराज किरण सोनवणे या पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने मंथन परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे सेंच्युरी सेमी इंग्लिश या शाळेत तो शिक्षण घेत आहे स्वराजने पहिली इयत्तेत एकुण पाच परिक्षा दिल्या आहेत त्यामध्ये लक्ष्यवेध परिक्षेत १०० पैकी ९६ गुण घेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला, एन. एस. ई. या परिक्षेत २०० पैकी १९४ गुण मिळवत राज्यात चौथा क्रमांक मिळविला, मंथन परिक्षेत १५० पैकी १४० गुण घेत राज्यात सहावा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला, गुरूकुल परिक्षेत १०० पैकी ९० गुण घेत राज्यात सहावा तर जिल्ह्य़ात पहिला क्रमांक मिळविला तसेच आय. एम. विनर या परिक्षेत २०० पैकी १८० गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला वरील पाच परिक्षेत स्वराजने राज्यस्तरवर व जिल्हास्तरावर या परिक्षांमध्ये जामखेड तालुक्याचे व आपल्या शाळेचे नाव चमकावले आहे,
या परिक्षांसाठी त्याला सेंच्युरी स्कुलचे मुख्याध्यापिका सौ. काळदाते मॅडम, सौ. पांढरे मॅडम यांच्यासह शाळेचे शिक्षक शिक्षीकांचे व पालक किरण सोनवणे व सोनाली सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
शालेय शिक्षणाबरोबरच स्वराज याचे वकृत्वही धारदार आहे मराठा मोर्चाच्या सभेवेळी त्याने मराठा आरक्षण याविषयी आपल्या भाषणात मुद्देसूद मांडणी केली होती व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गात उपस्थितांची मने जिंकली होती