जामखेड शहरातील चौधरी नगर येथे शिवगर्जना भक्ती महोत्सवाचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी
अष्टविनायक गणेश मंदिर व शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव निमीत्त उद्योजक पंकजशेठ चौधरी यांच्या वतीने भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे

सप्ताहातील दुसर्या दिवशीची किर्तनसेवा गवते महाराज यांची झाली त्यांनी
सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला! नाही तरी गेला जन्म वाया!! करिता बरोवरी दुरावशी दुरी! भवाचीया बुरी वाहवशी!!
ह. भ. प. हरी महाराज गवते यांनी या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन केले.
कुणाची बरोबरी केल्याने संसार पुर्ण होत नाही आणि संसार हा अपुर्ण रहाणारा आहे तर परमार्थ हा पुर्ण आहे जसे मंदिरावर कळस बसवल्याने मंदिर पुर्ण होतो पण संसारातील बंगला कधीही पुर्ण होत नाही राजा
रावणाचा संसार पुर्ण नाही झाला तर आपल्या सारख्या सामान्याचा कसा होईल
त्यामुळे जेवढी बरोबरी करू तेवढे या भवसिंधुच्या पुरात वाहुन जाऊ
देवाला आपलसं करण्यासाठी अंतःकरणात भक्तीरुपी भाव निर्माण व्हावा लागतो जगायचे कसं ते रामायण शिकवत तर मरायचे कसं हे भागवत शिकवते
जगाच्या पाठीवर सर्व जाती धर्माचा वारकरी संप्रदाय आहे आणि या सांप्रदायत सर्वांना परमार्थ करण्याचा अधिकार दिला आहे
ती आपली संस्कृती आहे तिचे रक्षण करण ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वारकरी संप्रदायाला संरक्षण दिले त्यामुळे प्रत्येक किर्तनकारांनी आपल्या किर्तनातुन छत्रपतींच्या कार्य कर्त्वावाचा गुणगौरव केला पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचे पालन करुन पापाचे खंडन करुन स्वराज्य निर्माण केले तत्कालीन इतर राज्य कर्तेंनी आपल्या दरबारी महिलांना नाचवले पण छत्रपतींनी महिलांना वाचवलं आसे गवते महाराजांनी सांगितले
कोंडाना किल्ला सर करतानाच प्रसंग सांगत आसताना सेनापती तान्हाजी मालुसरे यांची शौर्य गाथा सांगितले व आपल्या राजाबद्दल निष्ठा काय आसते हे या प्रसंगातून सांगुन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
त्यांना गायनाचार्य आंगद महाराज ढोले, मुकुंद महाराज भवर, भागवताचार्य गोरक्षनाथ भिल्लारे, दादामहाराज सातपुते माऊली महाराज, आबासाहेब महाराज वटाणे यांची साथ लाभली