Health : Diabetes असणाऱ्यांनो फक्त साखरच नाहीतर हे पदार्थही आरोग्यास हानिकारक, चुकूनही खाऊ नका

- Advertisement -spot_img

मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना डायबिटीसची समस्या मोठ्या प्रमाणात असते. बदलती जीवनशैली, ताणतणाव अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना डायबिटीसची समस्या निर्माण होताना दिसते. तर डायबिटीस झाल्यानंतर रुग्णांना त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहणे खूप गरजेचे असते. पण मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी त्यांची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे एक आव्हानच ठरते. तसेच मधुमेह रुग्णांना शुगर नियंत्रणात आणण्यासाठी पथ्य पाळावी लागतात. तर शुगर झाल्यानंतर लोकांना गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं लागतं.

साखर – डायबिटीज असलेल्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. कारण गोड पदार्थांमुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी साखर ही हानिकारक ठरते. साखर खाल्ली तर डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या शरीरातील ती जमा होते आणि ती चरबीच्या रूपात साठते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते आणि मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने त्यांच्या आहारात साखरेचा समावेश चुकूनही करू नये.

बटाटा – मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात बटाट्याचा समावेश करू नये. कारण बटाट्यामध्ये देखील साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच बटाट्यामध्ये फॅट, कॅलरी जास्त प्रमाण असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरतात त्यामुळे बटाट्याचा समावेश आहारात करू नये.

पांढरा ब्रेड, पास्ता – ज्यांना डायबिटीसची समस्या आहे अशा लोकांनी पांढरा ब्रेड खाऊ नये. सोबतच पास्ता देखील त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीसची समस्या आहे त्यांनी पास्ता, ब्रेडचा समावेश आहारात करू नये.

मैदा – डायबिटीज असलेल्या लोकांनी मैद्याचा समावेश त्यांच्या आहारात करू नये. कारण मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे लठ्ठपणा वाढतो, त्यामुळे मधुमेहाचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच मैद्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असतात त्यामुळे मैद्यापासून बनवलेले पदार्थ डायबिटीस असलेल्या रुग्णांनी खाऊ नयेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा