मेघगर्जनेसह जामखेड तालुक्यात मान्सूनचे झाले आगमन.

- Advertisement -spot_img

सायंकाळी सहा वाजेपासून पावसाची जोरदार बॅटिंग,मृग नक्षत्राचे बळीराजाने केले स्वागत.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे परंतु आज पासून बळीराजाला ओड लागली होती ती मृग नक्षत्राच्या मोसमी पावसाची आणी सायंकाळी सहा वाजता मेघगर्जना व विजांच्या

कडकडाटासह मान्सूनचे आगमन झाले आहे त्यामुळे आता शेतीच्या मशागतीला वेग येणार आहे तालुक्यातील काही भागात आवकाळी पावसाने मशागती झाल्या आहेत परंतु काही भागात आद्याप पाऊस झाला नसल्याने शेतीची मशागत थांबली होती


   आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता आणि सहा वाजता शहर व परिसरात  पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
मृग नक्षत्रात खरीप पिकांच्या पेरण्या केल्या जातात जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उडीद,मुग,सोयाबीन,बाजरी या पिकांचा पेरा होतो या नक्षत्रात चांगला पाऊस झाला तर पेरण्याही वेळेवर होतात त्यामुळे पुढील पिकांचे चांगले नियोजन बळीराजाला करता येते याच पाश्र्वभूमीवर जामखेड तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन केले जाते त्यामुळे आजच्या पावसाचे बळीराजाने मोठ्या आनंदात स्वागत केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा