आंतरराष्ट्रीय चित्रकार व शिल्पकार प्रमोदजी कांबळे यांचे हस्ते कलाशिक्षक मयूर भोसले यांचा सन्मान.

- Advertisement -spot_img

नगर जिल्हा कलाशिक्षक संघटनेच्या वतीने मयूर भोसले यांचा सन्मान .

कलाशिक्षक मयूर भोसले यांनी अडीच हजार विद्यार्थ्यांच्या साह्याने जागतिक विश्वविक्रम करून भारताचा गौरव तसेच भारताचा तिरंगा ध्वज जागतिक पातळीवर चमकावला हे काम कौतुकास्पद आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड चे काम एका कलाशिक्षकाने केले याचा निश्चितच मला अभिमान आहे. नगर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर चमकवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले असे मनोगत आंतरराष्ट्रीय चित्रकार व शिल्पकार प्रमोदजी कांबळे यांनी नगर जिल्हा कलाशिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात मनोगत व्यक्त केले.

नगर जिल्हा कला शिक्षक संघटना आयोजित सहचारसभेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय कलाशिक्षक मयुर कृष्णाजी भोसले यांचा जागतिक रेकॉर्ड साकारल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती आंतरराष्ट्रीय चित्रकार व शिल्पकार प्रमोदजी कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय पठाडे ,सचिव रवींद्र गायकवाड ,जिल्हा कार्यकारिणी कानिफनाथ गायकवाड, मंगेश काळे,सुनील दानवे , संतोष सरसमकर, कृष्णा पाचारणे, राजन समिनदर, संजयकुमार वस्तारे , मनोज सभादिंडे, अ.नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कलाशिक्षक उपस्थित होते.


मान्यवरांच्या हस्ते आशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र, मेडल , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
अ नगर जिल्हा कला संघटनेचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी श्री नागेश विद्यालय जामखेडचे कलाशिक्षक मयुर भोसले यांनी जगातील सर्वात मोठा भारताचा नकाशा विद्यार्थ्यांचे सहाय्याने तयार केला तसेच जय हिंद जय भारत त्यात नाव साकारले आणि हा भारताचा नकाशा जगातील सर्वात मोठा ठरला आहे मयूर भोसले यांचे अ नगर जिल्हा संपूर्ण कला शिक्षकांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करतो व यापुढेही असे नवनवीन उपक्रम राबवत असे शुभेच्छा देतो असे मनोगत व्यक्त केले .
कला संघटनेचे सचिव रवींद्र गायकवाड यांनी नगर जिल्ह्याचे भूषण मयूर भोसले यांनी जगातील सर्वात मोठा नकाशा साकारून विश्वविक्रमाची नोंद झाली आहे नगर जिल्ह्याचे नाव व रयत शिक्षण संस्थेचे नाव जागतिक पातळीवर चमकवले आहे असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
सर्व कला शिक्षकांनी मयूर भोसले यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा