संचालक आमोल राळेभात यांनी प्रचाराच्या झंझावातात काढला तालुका पिंजून..
जामखेड शहरात सहकार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
लोकनेते सहकार महर्षी स्व.जगन्नाथ तात्या राळेभात पा.यांनी सुरु केलेली परंपरा कायम ठेवत अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक श्री.अमोल दादा राळेभात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री.सुधीर दादा राळेभात यांनी सहकार मेळाव्याचे आयोजन केले होते.
लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.श्री.रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लोकनेते सहकार महर्षी जगन्नाथ तात्यांच्या पावलावर पाउल टाकीत सहकार क्षेत्रातील कार्यतत्पर जोडी म्हणून राळेभात बंधूकडे पाहिले जाते.
यावेळी सुधीर दादा राळेभात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करताना शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला हमीभाव नसल्याची खंत व्यक्त करून शासनामार्फत शेतकऱ्यांच्या सर्वागीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा मा.आ.रोहित दादा पवार यांच्यामार्फत स्वतः पाठपुरावा करून अशा योजना अमलात आणून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल,त्यांची लुट होणार नाही याची काळजी भविष्यात घेतली जाईल तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळेल, अशी ग्वाही रोहित दादा यांच्यावतीने शेतकरी बांधवाना दिली.
यावेळी बोलताना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात म्हणाले कि, जामखेड तालुक्यातील सहकार हा रोहित दादा पवार यांच्या बरोबर आहे. जामखेड तालुक्याच्या विकासासाठी रोहित पवार हेच आवश्यक असून दादा नामदार होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. रोहित दादा कर्जत जामखेडचे आमदार होणे हे आपल्या सर्वांचे भाग्य असून दादा पाच वर्षे लोकांत राहतात आणि समोरचे फक्त निवडणुका लागल्यावर दिसतात असे मत व्यक्त करून रोहित दादा पवार यांनी मंत्री झाल्यावर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
यावेळी बोलताना आ.रोहित दादा पवार यांनी लोकनेते सहकार महर्षी स्व.जगन्नाथ तात्या राळेभात पा.यांच्या सहकारातील कार्याचा वारसा सुधीर दादा व अमोल दादा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवत असल्याचे गौरवद्गार काढून त्यांच्या सहकारातील कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले. तसेच मागील ५ वर्षात त्यांनी केलेल्या पायाभूत, मुलभूत सर्वागीण विकासाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला व भविष्यात कर्जत जामखेड हे विकासाच्या रथावर स्वार असेल अशी ग्वाही दिली.यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
या सहकार मेळाव्यासाठी जामखेड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ तसेच सहकारी क्षेत्रातील अनेक आजी माजी पदाधिकारी, खास करून तरुण वर्ग असे साधारण साडेचार ते पाच हजार कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.