जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोशिएशन वआयएमए कडुन कलकत्ता महीला डॉक्टरच्या हत्येचा निषेध

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरातील डॉक्टर्स आक्रमक झाले आहेत. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून याच अनुषंगाने जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोशिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन कडुन कलकत्ता येथे झालेल्या महीला डॉक्टरच्या हत्येचा निषेध व्यक्त करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की कलकत्ता येथे आरजी कार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे सरकारी कर्तव्यावर रात्रपाळी करत असताना महिला डॉक्टर वरती अत्यंत अमानूष बलात्कार करून नंतर हत्या करण्यात आली व पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणारची ही पुनरावृत्ती झाली आहे. जे इतरांच्या जीवाचे रक्षण करतात त्यांच्या जीवाचे रक्षण कोण करणार ? त्यांना न्याय कोण देणार ? असा सवाल देखील या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

आम्ही असोसिएशन तर्फे तुमच्या मार्फत आरोग्य विभाग भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडे अशी मागणी करतो की प्रॅक्टिस करणाऱ्या सर्वच डॉक्टर्सना शासनाकडून सुरक्षा पूरवावी व कामाचा ताण कमी करावा आणि घडलेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करून गुन्हेगारांना योग्य ते शासन करावे असे म्हटले आहे.

महीला डॉक्टरवर पाशवी बलात्कार आणि निर्घृण हत्येची सखोल चौकशी व्हावी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हे सततचे हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष कायदा केला जावा, या मागण्यांसह विविध मागण्या देखील आयएमए ने देखील निवेदनाद्वारे केली आहे. आज शनिवार दि 17 ऑगस्ट रोजी दिवसभर जामखेड तालुक्यातील डॉक्टरांनी निषेध म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य़रुग्ण सेवा बंद केली होती.

यावेळी डॉक्टर प्रॅक्टिशनर्स असोशिएशन चे अध्यक्ष डॉ. संजय राऊत, उपाध्यक्षा डॉ. मनीषा राळेभात, सचिव डॉ. पांडुरंग सानप, डॉ. विद्या काशीद, आयएमए चे अध्यक्ष डॉ. गणेश झगडे, डॉ. आनंद लोंढे, डॉ. कल्याणराव काशीद, डॉ. महेश घोडके, डॉ. कुंडलिक अवसरे, डॉ. प्रदीप कुडके, डॉ. तानाजी राळेभात, डॉ. सुरेश काशीद, डॉ. अशोक बांगर, डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. प्रताप चौरे, डॉ मनोज शिंदे, डॉ. विकास शिंदे, डॉ. जतीन काजळे, डॉ. सचिन काकडे, डॉ. सागर शिंदे, डॉ. स्वाती चकोर,
डॉ. भारती मोरे, डॉ. सुजाता घोडके, डॉ. मनीषा अवसरे, डॉ. शितल कुडके
डॉ. भक्ती लोंढे, डॉ. राणी भोसले
डॉ. अर्चना झगडे, डॉ. स्वाती वराट
डॉ. रेडे मॅडम, डॉ. पल्लवी सूर्यवंशी
डॉ. मनीषा पवार, डॉ. चारुदत्त पवार, डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ. रोहिदास पवार, डॉ. वैभव तांदळे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. बेलेकर संदीप, डॉ. संतोष सोनार, डॉ. विवेक दळवी, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. बापू वराट, डॉ चंद्रकांत मोरे, डॉ फारुख आझम सह तालुक्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा