कलाकेंद्र नियमातच, कलाकारांवर अन्याय नाही, जामखेडच्या कलाकेंद्र चालकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

जामखेड परिसरातील नऊ कलाकेंद्र हे नियमानुसार चालतात या कलाकेंद्रात कुठलाही कलाकार व वादक यांच्या वर कुठलाही अन्याय होत नाही तसेच कोणाचीही उपासमार होत नाही त्यांना वेळच्या वेळी योग्य ते मानधन दिले जाते. याच अनुषंगाने आज दि. १६ ऑगस्ट रोजी जामखेड येथील नऊ कलाकेंद्र चालकांनी अहमदनगर येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कुठलाही कलाकार किंवा वादक यांना कामावरून काढलेले नाही. सर्व कलाकारांना त्यांचे योग्य ते मानधन वेळोवेळी दिले जाते. आठ दिवसांपूर्वी आखील महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकेंद्र या संघटनेने कलाकारांवर अन्याय होत असल्याचे निवेदन दिले होते. मात्र जामखेड येथील कलाकेंद्रात काम करणारे कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व उपासमारीची वेळ येत नाही.

आमच्या कलाकेंद्रात डिजे वैगेरे वापरत नाहीत. आम्ही कलाकेंद्रात सुर पेटी, ढोलकी, तबला व घुंगरू या सारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करत आहोत. या कलाकारांवर बेरोजगारी प्रश्न उद्भवला नाही. कोणाचीही उपासमार होत नाही.

केवळ कलाकार किंवा वादक यांचाच विचार न होता त्याबरोबर प्रत्यक्षात नृत्य काम करणाऱ्या महिला कलावंत, ज्यांच्या मुलाबाळांचा महिलांवर अधारीत कुंटुबाचा गांभिर्याने विचार व्हावा व योग्य न्याय मिळावा असे निवेदन जामखेड परिसरातील नऊ कलाकेंद्र चालकांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. डॉ. अरूण जाधव, मनसेचे तालुकाप्रमुख प्रदिप टाफरे, हिंदूराज मुळे, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, अरविंद जाधव, शुभम जाधव, रवी अंधारे, अनिल पवार, सनी सदाफुले, आतीष पारवे उमेश जाधव, भामाबाई जाधव, ज्योती पवार, संजिवनी जाधव, राजश्री जाधव, अलका जाधव, मंदा चंदन, अंबिका अंधारे, मंगल जाधव, आखील महाराष्ट्र लोकनाट्य थेअटर मालक संघटना बाळासाहेब काळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा