भुसार कर्जात वाढ यावर्षी सोसायटी वाढून भेटणार – अमोल दादा राळेभात

- Advertisement -spot_img

भुसारचा तालुका म्हणून अहिल्यानगर जामखेड तालुक्याची आहे ओळख..

हॅलो अहिल्यानगर न्युज जामखेड

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा.आ.श्री.शिवाजीराव कर्डिले साहेब व सन्मानीय संचालक मंडळ यांनी आज झालेल्या सभेमध्ये शेतकऱ्यांसाठी पिक (भुसार) कर्जाचे एकरी स्केल रु.३००००/–वरून रु. ४००००/– करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दिली.

  जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका हा भुसाराचा तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळे मागील वर्षीपासून अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे स्केल वाढविण्याबाबत अनेक वेळा मागणी केली होती.तसेच खताचे वाढलेले दर, मजुरांची वाढलेली रोजंदारी थोडक्यात उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ यामुळे शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे खूपच जिकिरीचे जात होते.

अशा परिस्थितीत नेहमी “शेतकऱ्यांचे हित जपणारी बँक” ही आपली ओळख कायम ठेवत जिल्हा बँकेने पिककर्जाचे स्केल वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय खास शेतकऱ्यांसाठी घेतला आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    यावेळी शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२५ पूर्वी कर्जाची परतफेड केल्यास त्यांना एप्रिल २०२५ मध्ये नवीन स्केलनुसार रक्कम रु.४००००/– एकरी दराने कर्ज पुरवठा करणार असल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल राळेभात  यांनी देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्याकडील कर्जाचा भरणा करावा, असे आवाहन केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा