इन्फंट इंडिया या संस्थेतील लहान मुलांसोबत सहा वर्षापासून करीत आहे आपला वाढदिवस साजरा !
जामखेड प्रतिनिधी
नेहमी प्रमाणे आपण आपला वाढदिवस केक कापून किंवा सोशल मीडिया मध्ये स्टेटस ठेवून स्वतः ला स्वतःचा वाढदिवस साजरा करत असतो मात्र आनंद राजगुरू यांनी 26 मे रोजीआपला वाढदिवस अगदी सध्या पध्दतीने आपला वाढदिवस साजरा केला. इन्फंट इंडिया , पाली, समाजाने नाकारलेल्या एचआयव्ही, एड्सग्रस्त आणि दगावलेल्या पालकांच्या पाल्याचे पालकत्व स्वीकारून, त्यांना एका तपापेक्षा अधिक कालावधीपासून त्यांचं संगोपन शिक्षण आणि पुनर्वसन करत असलेले आदरणीय श्री दत्ताभाऊ बारगजे सर यांच्या सेवेतला सहवास त्याने एकट्याने नव्हे तर सहकुटुंब अनुभवला .
आनंदवनातील काही सुखद क्षणाचे अनुभव कृतीतून देऊन त्यानी आपल्या पुढील पिढीला देखील सेवेच्या संस्काराचा धडा देताना आपला वाढदिवस साजरा केला.फ्लेक्स बोर्ड लावून किंवा चौकात टू व्हीलर वर केक कापून गर्दी करताना फटाके फोडणाऱ्या व त्यातून समाज्याला त्रास होतोय याची जाणीव नसलेल्या तरुणांना आनंद राजगुरू यांनी स्वत: चा वाढदिवस कसा साजरा करावा याचा हा प्रसंग म्हणजे कृतिशील दाखला आहे , युवा उद्योजक आनंद राजगुरू यांचा आदर्श आपण सगळ्यांनी नक्की घेतला पाहिजे.पुन्हा एकदा एक आदर्श उपक्रम राबवल्या बद्दल उद्योजक आनंद राजगुरू व त्याच्या कुटुंबीय यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आले.