७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त  देशातील सर्वात मोठे “२६ जानेवारी ” श्री नागेश विद्यालयात साकार .

- Advertisement -spot_img

देशातील सर्वात मोठे नाव म्हणून होणार आहे नोंद..

जामखेड शहरातील नागेश विद्यालयाचा अनोखा उपक्रम..

जामखेड प्रतिनिधी

७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिना निमीत्त रयत शिक्षण संस्थेच्या  श्री नागेश  संकुलात
नागेश विद्यालय,ज्युनिअर कॉलेज व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य मडके बी के यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले.

   प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्रांगणात  प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मानवी रचनेतील “२६ जानेवारी ” हे नाव साकारण्यात आले.
  यावेळी  “२६ जानेवारी “मानवी रचनेतील नावाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
भव्य मानवी रचनेतील “२६ जानेवारी ” नावची लांबी २२० व रुंदी १९० फूट असून क्षेत्रफळ ४१८०० स्क्वेअर फुट असून कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे सरकारले. या मानवी रचनेतील चित्रात  भव्य  २२५ फूट  तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे.श्री नागेश व कन्या विद्यालय मधील २३०० विद्यार्थी विद्यार्थिनी व १७ महा बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट सर्व शिक्षक सहभागी झाले.


    तसेच १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे श्री नागेश विद्यालय युनिट  उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना दिली.
      या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, ज्येष्ठ नेते प्रा मधुकर आबा राळेभात , विनायक राऊत, प्रकाश सदाफुले ,सुरेश भोसले, दिलीपशेठ बाफना ,मुख्याध्यापक संजय हजारे , पर्यवेक्षक विकास कोकाटे, डॉ सागर शिंदे, डॉ मयुरी शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल बहिर, अशोक यादव , शिवाजीराव ढाळे,राजेंद्र गोरे, कुंडल राळेभात,अमोल गिरमे,मोहन पवार, विष्णुपंत लटपटे, दिलीप ढवळे, मंगेश आजबे, दिगंबर चव्हाण,सुनील उगले, प्रा संजय उगले,सुनील शिंदे,विजयकांत घुमरे, शिकरे सर, पार्वती इनामदार, सुदेश दुगम आजी माजी सैनिक, रयत सेवक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन  स्वाती अभंग,मनीषा म्हस्के,ज्योती गोपाळघरे, संतोष सरसकर,शंभुदेव बडे यांनी यांनी  केले.
     प्राचार्य मडके बीके यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व  विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन संविधानाचे महत्त्व सांगून देशासाठी कार्य केलेल्या सर्वांना आदर्श मानून चांगले कार्य करावे असे मनोगत व्यक्त करून “२६ जानेवारी” हे मानवी रचनेतील नाव  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र आहे. देशातील सर्वात मोठे नाव म्हणून नोंद होणार आहे अशी अशी माहिती दिली.

       या देशपातळीवरील उपक्रमास आमदार रोहित दादा पवार, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे ,सहायक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद मिझार,  लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय हजारे यांनी केले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा