चोरीला गेलेल्या स्प्लेंडर गाडीचा जामखेड पोलीसांनी  दोन दिवसांत लावला छडा…

- Advertisement -spot_img

जामखेड पोलीसांनी बेनवडी ता.कर्जत येथुन अरोपीला घेतले ताब्यात !

जामखेड प्रतिनिधी

जामखेड बीड रोड येथील विजय कलेक्शन कापड  दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेले असता  विजय कलेक्शन दुकानात जाण्यापुर्वी फिर्यादी प्रकाश श्रीरंग राळेभात वय 37 वर्षे रा.कोल्हेवस्ती, जामखेड, यांची मोटारसायकल विजय कलेक्शन कापड दुकानासमोर ऊभी केली होती. मात्र दुकानातून खरेदी झाल्यानंतर 05/30 वा.च्या सुमारास दुकानातून बाहेर आल्यानंतर मोटारसायकल 30,000 /- रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मॉडेलची काळ्या रंगाची  सिल्व्हर रंगाचा पट्टा असलेली तिचा आर.टी.ओ. पासिंग क्रमांक MH16CM4819 असा असलेली तिचा चेसीज नं. MBLHAR086J5 L08028 इंजिन नं.HA10AGJ5L23168 असा असलेली
मोटारसायकल दिसली नाही. त्यानंतर त्यांनी  मोटारसायकलचा आजुबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यावरुन त्यांना खात्री झाली की  विजय कलेक्शन कापड दुकानासमोर ऊभी केलेली  भाऊ ज्ञानेश्वर याचे मालकीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे असे वाटल्याने त्यांनी जामखेड पोलीस येथे जाऊन अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दाखल केली असता जामखेड पोलीसांनी सिसिटीव्ही फुटेज च्या आधारे  दोन दिवसाच्या आत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून बेनवडी येथील कर्जत राशीन रोडलगत एका धाब्याच्या पाठीमागे गाडी लपून ठेवलेली होती तसेच जामखेड पोलीसांनी अरोपी कडील मुद्देमाल हस्तगत करून अरोपी प्रकाश आजिनाथ गायकवाड रा. बेनवडी ता. कर्जत वय 55 याला ताब्यात घेतले व जामखेड पोलीस स्टेशन येथे आणले. यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह.प्रवीण इंगळे, जे. ए.सरोदे,आर. एन.वाघ, प्रकाश मांडगे या पथकाने ताब्यात घेतले व पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण इंगळे हे करीत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा