जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने इप्तार पार्टीचे आयोजन.

- Advertisement -spot_img

मुस्लिम बांधवांच्या वतीने व मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने मानले पोलीस स्टेशन चे आभार.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड पोलिस स्टेशनचे एपीआय गौतम तायडे  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,रमजान महिन्याच्या आपण इफ्तार पार्टीचे आयोजित केली होती त्याचा आम्ही मुस्लिम बांधवान सोबत त्याचा स्वाद घेतला आहे आचारसंहिता मुळे आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर इफ्त्यार पार्टीचे आयोजन करता आले नाही परंतु पुढील वर्षी आपण मोठ्या स्वरूपात इफ्त्यार पार्टीचे आयोजन करू आणि या रमजान महिन्याच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलो आहे तसेच या रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यात पवित्र कुराण आपल्याला लाभले आहे. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांना खूप खूप असे हार्दिक शुभेच्छा देतो तसेच येणारा काळ त्यांना सुजलाम सुफलाम  जावो ही अल्लाकडे मी प्रार्थना करतो.तसेच मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझरभाई काझी यावेळी बोलताना म्हणाले की, पोलीस स्टेशन मार्फत इफ्त्यार पार्टी ठेवण्यात आली होती तसेच सर्व मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. दरवर्षी प्रमाणे पोलीस स्टेशन मार्फत फार मोठ्या प्रमाणावर इफ्त्यार पार्टीचे आयोजन केले जाते. तसेच जातीय सलोखा पाळला जातो.आचारसंहिता असल्यामुळे पोलीस स्टेशनी हा कार्यक्रम शॉर्टकट मध्ये घेतला आहे. माझ्या मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने व समाजाच्या वतीने सर्व हिंदू भावांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देतो यावेळी बोलताना काझी म्हणाले

तसेच जाकीर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या ठिकाणी सालाबाद प्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते नमाज पडण्याआधी इफ्त्यार झाले तसेच सर्व जातीय धर्माचे लोक येथे राहत आहेत. रमजान मध्ये राम आहे व दिपाली मध्ये वली आहे त्यामुळे आम्ही सर्व हिंदू मुस्लिम हम सब भाई भाई याप्रमाणे आम्ही सर्व राहत आहोत. एकात्मतेच्या दर्शन व जातीय सलोखा येथे पाळा जातो. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब, तायडे साहेब, तसेच त्याची सर्व पोलीस टीम या सर्वांनी सहभाग नोंदविला त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करण्यात आले. व त्याच्या सर्व टीम चे सत्कार करण्यात आले व मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने धन्यवाद मानले. यावेळी जामखेड पोलिस स्टेशनचे एपीआय गौतम तायडे पो.ना.अविनाश ढेरे पो.काँ. प्रकाश जाधव, पो. कॉ. दिनेश गंगे पो. कॉ. चव्हाण मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझरभाई काझी, नाझीम काझी, आबेदखान साहब, हाजी जावीदभाई सय्यद,जाकीर सर,इस्माईल भाई टेलर, राजुभाई खानसाहाब,फरमानभाई शेख, मुक्तारभाई सय्यद, खिजर खान (चाचा) व सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा