जामखेड – *अहमदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा. भास्कर पाटील यांची जामखेड पंचायत समिती शिक्षण गटशिक्षणाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट* त्यावेळी शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे मा.गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेबांच्या हस्ते मा. भास्कर पाटील साहेबांचा सन्मान करण्यात आला.मा. भास्कर पाटील साहेबांनी जामखेड तालुक्यातील बदलत्या सकारात्मक शैक्षणिक वातावरणाबाबत जामखेड शिक्षण विभागाचे भरभरून कौतुक केले.
भास्कर पाटील साहेब हे यशवंत पंचायतराज पाणी कमिटीच्या बैठकीसाठी जामखेडला आले होते. मा. पाटील साहेब नगर जिल्हयात शिक्षणाधिकारी प्राथमिक पदी नियुक्ती झाल्यापासून एक वेगळीच शिक्षणाची चळवळ सुरू झाली आहे. मिशन आपुलकी अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा समाजाचा सहभाग संपूर्ण जिल्हयात गोळा झाला.गाव, वाड्या,वस्त्यावरिल जि.प.च्या शाळेंचा चेहरामोहराच बदलून गेला.मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात मा.साहेबांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील 100% शाळांनी स्पर्धेत भाग घेतला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. हे सर्व करत असतांना प्रशासनावरही भास्कर पाटील साहेबांची मजबुत पकड आहे.त्यांच्या बद्दल सर्वांना आदरयुक्त भिती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मा. पाटील साहेबांनी वेळोवेळी केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,पदवीधर या पदांची शिक्षकामधून प्रमोशन केले. त्यामुळे रिक्त पदाची पोकळी भरून निघाली. विद्यार्थी शिक्षणाची घोडदौड सुरू झाली. हे करत असतांना शिक्षकांच्या अडी अडचणी, एक तारखेलाच पगार करणे, मेडिकल बिले व इतर बीलेही मा. पाटील साहेबांनी विशेष लक्ष घातले.जामखेड शिक्षणविभागाला दिलेली सदिच्छाभेट तालुक्यातील शिक्षकांसाठी खूप महत्वाची ठरली.
सत्कारांच्या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा. बाळासाहेब धनवे साहेब, विस्तार अधिकारी सुनिल जाधव, नरवडे साहेब, केंद्रप्रमुख केशव गायकवाड, विक्रम बडे, नवनाथ बडे,अहमदनगर शिक्षक बँकेचे संचालक संतोष कुमार राऊत, विश्वस्त मुकुंदराज सातपुते, सुनिलमामा भामुद्रे, तागड सर, बाळू गोरे इ.मान्यवर उपस्थित होते.