जामखेड प्रतीनीधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा जामखेड तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न.
दिनांक २६/७/२०२४ रोजी जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष फायकअली सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणीची मीटिंग संपन्न झाली असून तालुकाध्यक्ष दत्तात्रय राऊत यांच्या कार्यकारीनीतील सभासदांना जबाबदारी देऊन सन्मानित करण्यात आले.
अशी आहे जामखेड तालुका कार्यकारणी
जामखेड तालुका उपाध्यक्ष अशोक वीर व अविनाश बोधले, सरचिटणीस संतोष गर्जे , सहचिटणीस रिजवान शेख, खजिनदार, पप्पू भाई सय्यद, कार्यकारणी सभासद सुदाम वराट सर, किरण रेडे, अजय अवसरे, सैफअली सय्यद, अशोक दिवटे, निळकंठ थोरात, राजू भोगील, अमृत कारंडे व इत्यादींना अध्यक्ष दत्तात्रय राऊत यांच्या हस्ते पत्र देण्यात आले असून सदर कार्यक्रमात संवाद यात्रा फलकाचे अनावरण करिता प्रमुख पाहुणे डॉक्टर विनोद इंगळे व इंजिनियर रामभाऊ ढेपे साहेब, भगवान गायकवाड पाटील इत्यादी उपस्थित होते सदर पाहुण्यांच्या हस्ते संवाद यात्रा फलकाचे अनावरण करण्यात आले आहे.
उपस्थित पाहुण्यांनी संवाद यात्रेला आपला पाठिंबा जाहीर केला व सदैव पत्रकारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले, कार्यक्रम झाल्यावर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला तसेच सर्व सभासदांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने घड्याळाचे वाटप करण्यात आले व खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.