संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा.

- Advertisement -spot_img

सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची ताबडतोब दखल घ्यावी आन्यथा जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरू करणार: मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका

जामखेड प्रतिनिधी
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ तारखेपासून आंतरवली सराटी येथे सरकारने सगेसोऱ्यां बाबत अध्यादेशाचा कायदा पारित करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण लागू करून त्याची आमलबजावनी करावी यासाठी पुन्हा अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
या उपोषणास जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे
तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत आसल्याचे दिसुन येत आहे
सरकारने व प्रशासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात आन्यथा जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गावोगावी साखळी उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात इशारा दिला आहे तसेच उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे त्यामुळे त्यांच्या जिवीतास हानी पोहचली तर समाजाचा उद्रेक होईल त्यास संपुर्णपणे सरकार व प्रशासन जबाबदार राहिल आसे निवेदनात म्हटले आहे
याच आनुसंघाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सरकारला फटका बसला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आनेक आंदोलने मोर्चा उपोषण करूनही आणखीही आरक्षणाचे घोंगडे भिजत आहे सरकारने आतातरी या आंदोलनामुळे बसलेल्या फटक्यांचा बोध घ्यावा व आंदोलनावर कायमचा तोडगा काढावा आन्यथा पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत या आंदोलनामुळे सत्तेतील सरकारला फार मोठा फटका बसणार आसल्याचे बोलले जात आहे तसा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सकाळी आकारा वाजता जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील बहुसंख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा