सर्वच स्तरातून यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव
जामखेड प्रतिनिधी
राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा नगर येथे संपन्न झाल्या. महाराष्ट्राचे प्रेसिडेंट निलेश शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेले स्पर्धेत वाडिया पार्क येथे स्पर्धा घेण्यात आल्या एकूण 900 विध्यार्थी सहभागी होते. जिल्हा अध्यक्ष सचिन मकासारे , कोच ज्ञानेश्वर जमदाडे सर, गोकुळ सर, महिंद्र सर, ओंकार सर, थापा सर, जेयश सर व इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट शाहनवाज शेख व ओंकार राठोड उपस्थित होते. तर संकेत जमदाडे ह्याने म्युझिकल ,पॉइंट फाईट व लाईट कोनट्याक मध्ये आशे 3 गोल्ड मेडल मिळवले आहे. सानिका हुलगुंडे हिने म्युझिकल व लाईट कोनट्याक मध्ये 2 गोल्ड मेडल मिळवले आहे. शिवानी वीर हिने किक लाईट मध्ये गोल्ड मेडल तर पॉइंट फाईट मध्ये सिलवर मेडल मिळवले आहे. ऋषिकेश बाबर ह्याने लाईट कोनट्याक मध्ये सिलवर मेडल मिळवले आहे. बुद्धभूषण अव्हाड ह्याने म्युझिकल मध्ये ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. तर कार्तिकी पोतदार हिला पण म्युझिकल मध्ये ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. सहभागी विध्यार्थी वैष्णव जायभाय, नुपूर सातपुते, आर्यन ढवळे. तर जामखेडने एकूण गोल्ड मेडल 6 मिळवले आहे. तर 2 सिलवर, 2 ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. तर विध्यार्थ्यांची नॅशनल साठी निवड झाली आहे. तर जामखेडचे माकोडे सर, नितीन मोहोळकर सर, धनगडे सर, साळुंखे सर शिवसेना अध्यक्ष संजय काका काशीद यांनी सुद्धा कौतुक केले.