जामखेड प्रतिनिधी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज्यामध्ये जुन्या रुढी आणि परंपरा यासाठी आवाज उठविला होता. याच अनुषंगाने आपण देखील अनिष्ट रुढी परंपरा बंद करत आहोत. प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात व पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व समाज्याला न्याय देण्याचे काम पत्रकार करत असतात असे मत जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमित्त आज 6 जानेवारी 2025 रोजी जामखेड मिडिया क्लबच्या वतीने हॉटेल आशा भेळ याठिकाणी पत्रकार दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील, जामखेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत, आशा भेळचे संचालक प्रफुल्ल सोळंकी, भीम टोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, जामखेड मिडिया क्लब चे अध्यक्ष सुदाम वराट, पत्रकार मोहीद्दीन तांबोळी, आशोक वीर, संजय वारभोग, अविनाश बोधले, कीरण रेडे, पप्पुभाई सय्यद, निलेश वनारसे, अजय अवसरे, संतोष गर्जे, फारुक शेख, राजु भोगिल, राजकुमार थोरवे सर व नितीन काशिद सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत म्हणाले की महाराष्ट्र शासन मराठी पत्रकार दिन साजरा करते, इंग्रज राजवटीत असताना सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज जागृतीसाठी व बंधुभाव सामाजिक एकता आणि स्वातंत्र्य साठी लोकांमध्ये भावना जागृत करण्यासाठी दर्पण या नावाचे वृत्तपत्र काढले त्या काळामध्ये वृत्तपत्र काढणे आणि चालवणे फार कठीण होते परंतु या व्यक्तीने हे वृत्तपत्र चालवलं आणि समाजामध्ये जागृती निर्माण केली वयाच्या वीसाव्या वर्षी वृत्तपत्र काढणे आणि चालवणं ही फार सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांनी आजची पत्रकारिता केली पाहिजे आसे मत जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांनी व्यक्त करत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी भिमटोला यंग ग्रृप सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड यांनी देखील पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार पत्रकार कीरण रेडे यांनी मानले.