दिघोळ माळेवाडी या गावातील जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावाने प्रतिष्ठान देणार पाच हजार रुपयांचा धनादेश
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील आबासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने आजपासून आनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे
या परिसरातील मुलींच्या जन्माचे स्वागत प्रतिष्ठान आर्थिक मदत देऊन करणार या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष पै. धिरज रामभाऊ रसाळ व पै सुरज रसाळ या दोन्ही भावंडांनी सामाजिक बांधिलकी जपत व मुलगी वाचली पाहिजे शिकली पाहिजे या उद्देशाने या गावातील प्रत्येक कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याचे आज जाहीर केले आहे
वारसा समाजसेवेचा हे ब्रीद वाक्य घेऊन माजी उपसरपंच कै. पै रामभाऊ रसाळ यांनी या भागात सामाजिक राजकीय कार्य केले आहे हीच परंपरा जपत त्यांचे दोन्ही मुलं आपला व्यावसाय संभाळत वारसा जपत आहेत
आज समाजात मुलींचे प्रमाण कमी झाले आहे शेतकरी गोरगरीब कुटुंबात कुणीही मुलगी देण्यास धजवत नाहीत यामुळे प्रत्येक गावागावात कितीतरी युवक अविवाहित आहेत ही दरी भरली पाहिजे यासाठी या प्रतिष्ठानच्या वतीने मुलींना जन्मताच अर्थसाहाय्य करण्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा तंटामुक्ती अध्यक्ष दिघोळ माळेवाडी पै. धिरज भैय्या रसाळ यांनी सांगितले आहे.
नवरात्रात उत्साहात दिघोळ माळेवाडी येथे नऊ दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आबासाहेब प्रतिष्ठानच्या व हनुमान तरुण मंडळ दिघोळ यांच्या वतीने करण्यात आले होते तसेच या पुढेही आसेच सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जाणार असल्याचे रसाळ यांनी सांगितले