जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात एन एम एम एस या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड येथील कन्या विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.चालू शैक्षणिक वर्षात विद्यालयाचा निकाल 72 टक्के लागला असून 13 विद्यार्थिनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत चमकल्या आहेत. यापैकी दोन विद्यार्थिनी कु गौरी ढवळे व प्रगती निकम या विद्यार्थिनींनी 150 गुण मिळवून तालुक्यात प्रथम आल्या आहेत; तर डॉली मौर्या हिचा 137 गुण मिळवून द्वितीय क्रमांक आला आहे. तर श्रेया बांगर व संध्याकाळी या दोन मुलींना संयुक्तपणे 131 गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळाला आहे.
सारथी शिष्यवृत्तीमध्ये विद्यालयाच्या 38 विद्यार्थिनींना सुयश प्राप्त झाले आहे सदर विद्यार्थिनींना पुढील पाच शैक्षणिक वर्षांमध्ये 26 लाख 4 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे आत्तापर्यंत विद्यालयाच्या 153 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळविण्यात यश मिळाले आहे विशेष बाब अशी की जामखेड येथील कन्या विद्यालयाची ही यशाची परंपरा कायम ठेवताना अनेक अनेक क्षेत्रांमध्ये मुली यशस्वी आघाडी घेताना दिसतात
या परीक्षेसाठी विभाग प्रमुख म्हणून श्री बाबासाहेब आंधळे यांनी मार्गदर्शन केले तर प्रशांत पोकळे विलास पवार रश्मी मुसळे व मीरा साळुंखे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कुसुम चौधरी व पर्यवेक्षक श्री संजय हजारे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली गेली आहे.
एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या सर्व शिष्यवृत्तीधारक मुलींना ट्रॉफी पदक प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संतोष सरसमकर आणि आभार संभूदेव बडे यांनी मानले. स्कूल कमिटीचे सदस्य प्राध्यापक मधुकर राळेभात प्रकाश सदाफुले सुरेश भोसले यांनी सर्व मुलींचे अभिनंदन केले.