दोन दिवसात पहिला हप्ता मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शासनाने या योजनेसाठी बजेटमध्ये अनोखी तरतूद केलेली आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ नावनोंदणीत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी तहसीलदार गणेश माळी, कर्जत तहसीलदार गुरू बिराजदार, महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, बापुराव ढवळे, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचरणे, बाजीराव गोपाळघरे, अल्ताफ शेख, अमित चिंतामणी, गौतम उतेकर,
यावेळी बोलताना आमदार प्रा. राम शिंदे यांनी कर्जत जामखेड तालुक्याचा माझी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने संदर्भात आढावा घेतला दोन्ही तालुक्यात एकूण पुर्ण अर्ज 82500 अपेक्षित आहे. जे रिजेक्ट झाले आहेत तेही लवकरच त्रुटी दूर करून पुर्ण करण्यात येतील.
कर्जत-जामखेड मतदारसंघात ६५ हजार ७९९ अर्ज
आले असून ६४३७४ पात्र ठरले आहेत.
त्यात कर्जतमध्ये ३८ हजार १५२ पैकी ३७ हजार ४०३ मंजूर झाले आहेत. जामखेडच्या २७ हजार ६४७ महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी २६९७१ मंजूर झाले आहेत. जे अर्ज तात्पुरते अपात्र झाले आहेत. त्या अर्जाच्या त्रुटी लवकरच पुर्ण केल्या जातील.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ माझी लाडकी बहिण योजना नोंदणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपले जे लंक्षाक आहे त्याची मुदत 31 आँगस्ट आहे पण आपण 25 तारखेपर्यंत सर्व अर्ज भरून लंक्षाक पुर्ण करावयाचे आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे साठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना कार्यान्वित केलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमल बजावणी साठी विधान सभा क्षेत्र निहाय ११ जणांची समिती गठित करण्यात आलेली आहे . त्यामध्ये ३ अशासकीय सदस्य आहेत तर कर्जत जामखेडच्या अध्यक्षपदी आ.राम.शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे तर दोन अशासकीय सदस्य म्हणून धनंजय मोरे खेड, कर्जत व बापूराव ढवळे पिंपरखेड ता. जामखेड हे आहेत.