जामखेड प्रतिनिधी
ग्रामीण विकास केंद्र,संविधान साथी टीम, माय लेकरु प्रकल्प व GLDOP फेलो महाराष्ट्र,कर्जत जामखेड आयोजित संविधान समता वारकरी दिंडी
तिसरे वर्ष श्री क्षेत्र सिताराम गड खर्डा ते (धनेगाव धाकटी) पंढरी पायी दिंडी समतेच्या विचार घेऊन निघते या दिंडीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारोच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
दिंडीची सुरुवात श्री क्षेत्र सिताराम गड खर्डा येथून करण्यात आली यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.विजय झंजाड साहेब व कोरो इंडिया पदाधिकारी मुमताज ताई शेख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून संविधान समता दिंडीची सुरुवात झाली …
*मा विजय झंजाड* (सहाय्यक पोलीस निरीक्षक खर्डा) यांनी संविधान समता स्वातंत्र्य बंधुता या विषयी मनोगत व्यक्त केले. व संविधान समता दिंडीला शुभेच्छा दिल्या.तसेच ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक मा.बापू ओहोळ म्हणाले की संविधान समता दिंडीमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही स्त्री पुरुष समान या भूमीतील साधुसंताने सुद्धा हाच समानतेचा धागा जपला आहे.
कोरो इंडिया संस्थेचे पदाधिकारी मा.मुमताज ताई शेख यांनी संविधान समता बंधुता स्वतंत्र्य अधिकार याबद्दल सर्वांना समजेल असे मनोगत व्यक्त केले .
निवारा बालगृह मोहा फाटा समता भूमी जामखेड येथील अनाथ निराधार विद्यार्थ्यांनी संविधान समता याबद्दल सुंदर असे पथनाट्य सादर केले. प्रस्ताविक विशाल पवार यांनी केले. व संविधान समता दिंडी खर्डा शहरातून धाकटी पंढरी धनेगाव मार्गाकडे रवाना होत असताना …खर्डा येथील उद्योजक मा. कैलास जाधव, मा शहाजी सोनवणे, आशीक शेख, डॉ.राळेभात, दादा पाटील, वडार समाज संघटना यांच्या वतीने चहापाणी व फराळ देऊन संविधान समता दिंडीचे स्वागत करण्यात आले तसेच सातेफळ या ठिकाणी भोसले परिवाराच्या वतीने चहा पाणी व फराळ दिले. व संविधान समता दिंडीचे स्वागत राजेंद्र भोसले, आजिनाथ लटके, मोहन भोसले, सावळा भोसले, मच्छिंद्र भोसले, आप्पा भोसले, अशोक भोसले व ग्रामस्थांनी स्वागत केले. व तरडगाव फाटा या ठिकाणी पंचशील युवा मित्र मंडळाच्या वतीने संविधान समता दिंडीचे स्वागत केले. व सर्व वारकऱ्यांना चहा पाणी याची व्यवस्था केली तरडगाव फाटा येथून मा.निलेश भाऊ गायवळ आपल्या सहकाऱ्यांसोबत संविधान समता दिंडीमध्ये सामील होऊन तरडगाव फाटा ते सोनेगाव पायी दिंडीत वारकऱ्यांसोबत चालत गेले मा.निलेश भाऊ गायवळ यांच्या वतीने दिंडीचे स्वागत केले ॲड .डॉ. अरुण आबा जाधव यांचा सन्मान केला.व सोनेगाव या ठिकाणी गेली चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली..
संविधान समता दिंडी धाकटी पंढरी धनेगाव मार्गाकडे निघाली दिंडी मध्ये फुगड्याचा समता वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतला.
संविधान समता दिंडी धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी पोहचली झाली असतात.. समता वारकऱ्यांनी रिंगण सोहळा आखून भगवी पथक खांद्यावर घेऊन समतेच्या घोषणा जोरात देऊन रिंगण मारले ..
बालगृहातील विद्यार्थ्यांनी मृदूगांच्या तालावर फुगडी नृत्याला ठेका धरला होता धाकटी पंढरी धनेगाव अगदी समता वारकऱ्यांच्या आनंदाने दुमदुमून गेली होती .
यावेळी ॲड.डॉ.अरुण आबा जाधव (ग्रामीण विकास केंद्र संस्थापक अध्यक्ष) म्हणाले की हा देश साधू संतांच्या देश आहे महापुरुषांचा देश आहे या देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले महात्मा फुले जन्माला आले डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले या देशात संत ज्ञानेश्वर जन्माला आले संत तुकाराम महाराज जन्माला आले संत चोखा संत कबीर जन्माला आले या देशात अनेक महापुरुष जन्माला आले सर्व महापुरुषाने समतेचा संदेश दिला आहे.कोणी उच नाही कुणी नीच नाही कुणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही कोणी कोणावर अन्याय करायचा नाही स्त्री पुरुष भेदभाव कुणी करायचं नाही या साधू संतांनी सांगितले आहे. त्याच साधुसंताचा व महापुरुषांचा विचार घेऊन समता, बंधुता, स्वातंत्र्य संविधानाचा विचार करून संविधान समता दिंडी गेली तीन वर्षापासून काढतोय ..
यावेळी संविधान समता दिंडीचे स्वागत विधान परिषदेचे आमदार मा.प्रा.राम शिंदे साहेब यांनी केले. मधुकर आबा राळेभात यांनी मनोगत व्यक्त केले व दिंडीचे स्वागत तसेच सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केली व आभार उमाताई जाधव यांनी मानले यावेळी ..
विशाल पवार, तुकाराम पवार, नीता इंगळे, गणपत कराळे, दिपाली काळे, शितल पवार, उर्मिला कवडे,मंगल शिंगाणे, भीमराव सुरवसे, लाला वाळके, सुनिता बनकर, उज्वला मदने, लता सावंत, रोहिणी राऊत,शितल भिंगारे, सचिन भिंगारदिवे, ऋषिकेश गायकवाड, रेश्मा बागवान, द्वरका पवार, राजू शिंदे, सुरेखा चव्हाण, संगीता केसकर, सोनाली घोडेस्वार, दिसेना पवार,शुभांगी गोहेर, अर्चना भैलुमे व तुकाराम शिंदे उपस्थित होते.