तरूण पिढीने ऑनलाईन गेमच्या मोहजाळापासुन सावध रहावे : अकाश महाराज भोंडवे.
प्रतिनिधी
अशोक वीर
संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत ह. भ. प. रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या आशिर्वादाने सुरू आसलेल्या भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहातील सहाव्या दिवशीची किर्तनसेवा शिवचरित्रकार. ह. भ. प. अकाश महाराज भोंडवे यांची संपन्न झाली
गेल्या पाच दिवसांपासून भाविकांना या नामसप्ताहात मोठ्या भक्तीमय वातावरणात महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांच्या किर्तन श्रावणातुन संतांनी समाजाला दिलेली शिकवण, संतानी भगवंताच्या प्राप्तीचे सांगितलेले साधन तसेच मनुष्य जिवाच्या उध्दारासाठी काय केले पाहिजे यासाठीचे संत चरित्राचे दाखले दृष्टांत देत महत्त्व पटवून दिले तर शिवचरित्रावर
भोंडवे महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या परक्रमांची गाथा सांगितली यावेळी कोंडाणा किल्ला सरकरतानाचा प्रसंग आपल्या पहाडी आवाजातुन सांगत स्वराज्यासाठी कितीतरी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली आसे सांगितले.
पुढे बोलताना महाराज म्हणाले की जमदारवाडी गावाने आदर्शवत नामयज्ञ चालवला आहे ज्ञानयज्ञाबरोबर अन्नदान सुरू आहे त्याचा सर्व भाविक भक्तांनी आनंद घ्यावा व वारकरी संप्रदायाची पतका मनामनात रूजावी असे कार्य व्हावे
तसेच किल्ले रायगडावर सोळाव्या शतकात सर्व समाजाला न्याय मिळत होता वारकरी संप्रदायाला रायगडाच्या गादीने संरक्षण दिले परंतु हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत आज बहुतेक सुविधांचा अभाव दिसून येतो आहे यासाठी आम्ही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केल्याने त्याची दखल घेत आता काही मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर काम सुरू झाले आहे रायगडाच्या पायथ्याशी सत्तर एकर जागेवर शिवसृष्ठीचे काम सुरू झाले आहे वर्ल्ड हेरिटेज स्थळामध्ये रायगडचा समावेश ही आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे
तसेच युवकाल युवा वक्तव्याची भाषा कळते याच अनुषंगाने बोलताना भोंडवे महाराज म्हणाले की आजच्या तरूणांना मोबाईल गेम्सचे व्यसन लागले आहे त्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खेळाडू यांच्या आॅनलाईन गेम्सच्या जाहिरातीकडे युवक आकर्षित होत आसुन कमी वेळात श्रीमंत होण्याच्या लालसेने कष्ट करून मिळविलेली संपत्ती वाया घालुन नैराश्याच्या गर्तेत जात आत्महत्या करत आहेत या गेम्समध्ये आपले आर्थिक नुकसान होवु शकते अशी सूचना दिलेली असताना तरी देखील तरूण ती सुचना गांभीर्याने घेत नसल्याने आपली मोठ्या प्रमाणावर हानी करून घेत आहेत आणि हे टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरित्राचे वाचन करून आपले जिवन सार्थकी लावण्याचा सल्ला तरूणांना महाराजांनी दिला आहे.
यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ महिला भगिनी युवक उपस्थित होते गेली पाच दिवसांपासून जमादारवाडी येथील शिव शक्ती तरूण मंडळ भोजन वाटपाची व्यवस्था करत आहेत
पंचक्रोशीतील भजनी मंडळांची उपस्थित लाभत आसुन या नामसप्ताहातीला मोठे भक्तीमय स्वरूप आल्याचे दिसून येते आहे.