तपनेश्वर जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन साजरा..

जामखेड (प्रतिनिधी) –आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची उज्ज्वल ओळख पटली.विद्यार्थ्यांच्या गुणगौरवात मला मोठा अभिमान वाटतो. शिक्षक–पालकांच्या पाठबळामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.भविष्य घडवण्यासाठी तुम्ही देशभक्ती, मेहनत आणि आत्मविश्वास ठेवा.असे धवजारोहणप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज पवार यांनी बोलताना सांगितले.

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज पवार यांच्या हस्तेध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बळीराम अवसरे, उपाध्यापिका जया चौभारे, शिक्षिका सुजाता राक्षे,शुभांगी साळुंके, शितल कदम, रूपाली कांबळे,निशा तांबे तसेच पालक प्रतिनिधी आरिफ बागवान उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन संजय आरेकर यांनी मानले.
