उद्या जामखेड शहरात निलेश लंके व आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून करण्यात आले नागरीकांना अवहान.
जामखेड प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार निलेश लंके यांची आहील्यानगर (नगर दक्षिण मतदार संघात) स्वाभिमान जनसंवाद यात्रा ९ एप्रिल पासुन जामखेड व कर्जत तालुक्यात येत आहे. या निमित्ताने आ. रोहित पवार व उमेदवार निलेश लंके यांची ही जनसंवाद यात्रा सलग तीन दिवस कर्जत जामखेड तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधणार आसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना विजयसिंह गोलेकर यांनी सांगितले की दि ९ एप्रिल रोजी आ. रोहित पवार व उमेदवार निलेश लंके यांची ही स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सकाळ पासूनच जामखेड तालुक्यातील नागरीकांशी संवाद साधणार आहे. या मध्ये नायगाव येथे सकाळी ११ वा, राजुरी येथे दुपारी १२ वाजता, नान्नज येथे दुपारी ३ वाजता, जवळा येथे सायंकाळी ४ वाजता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे सायंकाळी ६ वाजता, तर सर्वात शेवटी जामखेड शहरातील तहसील कार्यालयासमोर सायंकाळी ७ वाजता उमेदवार निलेश लंके यांची आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत भव्य आशी सभा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच बुधवार दि १० व ११ एप्रिल रोजी हीच जनसंवाद यात्रा कर्जत तालुक्यातील विविध गावांना भेटी देणार आहे. जामखेड येथे होणाऱ्या सभेचे जय्यत तयारी केली असुन हजारोंच्या संख्येने जामखेड तालुक्यातील नागरीक या सभेस उपस्थित राहणार आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील गावोगावी पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या समवेत नियोजन बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. आशी माहिती अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी दिली आहे.
यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, सुर्यकांत (नाना)मोरे, कृषी उत्पन्न समिती पारनेरचे चेअरमन बाबाजी तरडे, हंगा येथील सरपंच राजेंद्र शिंदे, उपसरपंच गणेश साळवे, मुकंद दळवी, शहाजी (काका) राळेभात, प्रशांत (काका) राळेभात, संजय वराट, हनुमंत पाटील, अमित जाधव, प्रा.लक्ष्मण ढेपे, आम आदमी पार्टीचे तालुकाधक्ष संतोष नवलाखा, प्रहार चे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, कल्लु चाचा, सरपंच सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, अमर चाऊस, हरीभाऊ बेलेकर, प्रा विकी घायतडक, वैजनाथ पोले, प्रकाश काळे, सह तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.