सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नांमुळे दुर्मिळ प्रजातीच्या मांडुळाला मिळाले जिवदान.

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी
दुर्मिळ जातीचे मांडूळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या सहकार्याने वन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन
शनिवार दिनांक ८/६/२०२४रोजी जामखेड शहरातील जनावराचा दवाखाना समोर वीट भट्टी कामगार काम करत असताना एक भले मोठे चार फुटी मांडूळ जातीचे दुर्मिळ असलेली वस्तू सापडलेली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष पांडू राजे भोसले यांनी दिली

सदर ठिकाणी संजय काका कोठारी हे आपले मित्र महेंद्र क्षीरसागर यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ताबडतोब जामखेड तहसीलदार गणेश माळी साहेब आणि गणेश मिसाळ सहाय्यक वनसंरक्षक तसेच  वनरक्षक प्रवीण उबाळे, रवी राठोड शामराव डोंगरे शांतिनाथ सपकाळ पांडुरंग भोसले  यांना माहिती दिली सर्वजण घटनास्थळी येऊन ते व्यवस्थित त्यांच्या ताब्यात दिले आहे सदर प्राणी हा दुर्मिळ असल्यामुळे त्याची लोक तस्करी करत असतात


दुतोंड्या साप या नावाने सर्वपरिचित असलेला एक बिनविषारी साप.मांडुळाची शेपटी आणि डोके प्रथमदर्शनी सारखेच दिसतात. त्यामुळे त्याला दोन तोंडे आहेत असे भासत असल्याने त्याचे नाव दुतोंड्या साप पडले आहे.मांडुळाची शेपटी आणि डोके प्रथमदर्शनी सारखेच दिसतात. त्यामुळे त्याला दोन तोंडे आहेत असे भासत असल्याने त्याचे नाव दुतोंड्या साप पडले आहे.मांडूळ शेतकऱ्यांचा मित्र आहे.महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळतो. प्रजानन कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असतो.तो निशाचार प्राणी आहे.तो उंदीर, घुशी इत्यादी खातो आणि त्यांची संख्या कमी करून शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत करतो. या सापाविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे त्यांची अकारण हत्या केली जाते. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मांडुळाला संरक्षण देण्यात आले आहे.
अंधश्रद्धेपोटी मांडूळ प्रजात धोक्यात आले आहे
या मांडूळ चे वजन २:५०० kg असून भुतवडा येथील फॉरेस्ट क्षेत्रांमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांच्या आदेशाने सोडण्यात आले
हे मांडूळ प्रवीण मोरे, भाऊ काटकर , बाबासाहेब म्हेत्रे, पप्पू पालकर ,लक्ष्मण काटकर यांनी  पकडून ताब्यात दिले आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा