जामखेड बसस्थानकातून विवाहित महिला बेपत्ता, सापडल्यास जामखेड पोलीसांशी संपर्क साधावा.

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

माहेरी यात्रेसाठी गेलेली विवाहीत महीला ही तालुक्यातील बोर्ले या ठिकाणी येण्यासाठी जामखेड बसस्थानकात दि 12 एप्रिल रोजी आली आसता ती दुपारी अचानक बसस्थानकातुन बेपत्ता झाली. याबाबत ती कोणास अढळुन आल्यास जामखेड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी की बेपत्ता विवाहित महिला संस्कृती युवराज काकडे वय 19 वर्षे रा. बोर्ले ता. जामखेड हि दि. 10 एप्रिल रोजी बोर्ले येथून बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील
निमगाव मायंबा येथे माहेरी आपले सासरे बापुराव हौसराव काकडे यांच्या बरोबर गेली होती. ती 11 तारखेला यात्रा झाल्यावर दि 12 एप्रिल रोजी जामखेड येथील बोर्ले या गावी आपल्या सासरी येण्यासाठी निघाली होती. या सोबत तीचे सासरे देखील सोबत होते. विवाहित महीला ही जामखेड बसस्थानक येथे आल्यावर तीचे सासरे बापुराव काकडे यांना तीने फळे आणण्यासाठी बस स्थानकाच्या बाहेर लावले सासरे हे फळे घेऊन आल्यानंतर त्यांना आपली सुन संस्कृती ही बसस्थानकात दिसुन आली नाही. त्यामुळे त्यांनी बसस्थानक परीसरात शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही. यानंतर तीचे सासरे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेऊन सुन हरवल्याची तक्रार दाखल केली.

दोन वर्षांपूर्वी संस्कृती हिचे युवराज बरोबर लग्न झाले होते. दोन वर्षातच जामखेड बसस्थानकातून विवाहित महिला ही बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता झाल्याची खबर बापुराव हौसराव काकडे यांनी जामखेड पोलीसांना दिली यानुसार पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष कोपनर हे तपास करीत आहेत.

चौकट

बेपत्ता विवाहित महिला संस्कृती युवराज काकडे वय 19 हि कोठे कोणाला आढळल्यास जामखेड पोलीस स्टेशनच्या 02421- 221033 व पोलीस नाईक संतोष कोपनर 9552507599 यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. संतोष कोपनर हे करत आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा