महिलेस धमकी देत केला आत्याचार.जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

इन्स्टाग्रामवर कॉल करून तू माझ्याशी बोल नाहीस तर तुझे कॉल रेकॉर्डिंग व मेसेज मी व्हायरल करेल असे म्हणुन महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळले तसेच तू मला भेटली नाही तर तुझे लॉजमध्ये काढलेले अश्लील फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन पीडित महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी एकजणा विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत महीलेने जामखेड पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल केली आसुन आरोपी सागर बाळु लोखंडे रा. आरोळे वस्ती, जामखेड याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की आरोपीने पिडीत महीलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तसेच इन्स्टाग्रामवर कॉल करुन तु मला आवडतेस, मला कॉल करत जा, माझ्याशी बोलली नाही तर मी तुझ्या मुलाला व नवर्‍याला मारुन टाकेल, माझ्याकडे बंदुक आहे आशी धमकी दिली. त्यानंतर या धमकी मुळे महीलेने त्याच्याशी इन्स्टाग्रामवर बोलण्यास सुरवात केली. काही दिवसांनी तो पिडीत महीलेला पैसै मागायला लागला व वेळोवेळी तिला धमकी देऊन 30 हजार ते 40 हजार रूपये पिडीत महीलेकडुन घेतले.

त्यानंतर काही महीन्यांनी आरोपी सागर लोखंडे याने महीलेस फोन केला व लॉजवर भेटायला बोलवले, तु आली नाही तर घरी येऊन तुला मारुन टाकेल आशी धमकी महीलेस दिली. त्यामुळे ती महीला घाबरली व तिला लॉजवर घेऊन गेला व पिडीत महीलेवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी हा वेळोवेळी पिडीत महीलेस लॉजवर बोलावत होता. परंतु पिडीत महीला गेली नाही. त्यामुळे आरोपी सागर लोखंडे याने पिडीत महीलेस धमकी दिली की तु जर माझ्या सोबत लॉजवर आली नाही तर तुझ्या सोबतचे लॉजमध्ये काढलेले अश्लील फोटो मी व्हायरल करेल अशी धमकी दिली.

पिडीत महीलेस आरोपी हा जास्त त्रास देत असल्याने आखेर ही घटना तीने आपल्या पतीस सांगितली. यानंतर पिडीत महीलेने शनिवार दि 14 डीसेंबर 2024 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर बाळु लोखंडे रा. आरोळे वस्ती जामखेड याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा