राज्यात आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी,२६ जुनला होणार मतदान

- Advertisement -spot_img

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सात टप्प्यात निवडणूक होत असून चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. यानंतर लगेच
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदार होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.मात्र विविध शिक्षक संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १० जूनला होणारी पदवीधर निवडणूक १५ जूननंतर घेण्याची मागणी यावेळी विविध संघटनांनी केली होती.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदार होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

आयोगाकडून राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र विविध शिक्षक संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १० जूनला होणारी पदवीधर निवडणूक १५ जूननंतर घेण्याची मागणी यावेळी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. ही मागणी लक्षात घेता निवडणुका २६ जून रोजी होणार आहेत.

मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर

निवडणूक कार्यक्रम—

1) उमेदवारी अर्ज भरणे –
31 मे 2024 ते 07 जून 2024

2) अर्ज छाननी – 10 जून 2024

3) उमेदवारी माघारीची अंतिम तारीख – 12 जून 2024

4) मतदान दिनांक – 26 जून 2024
वेळ – सकाळी 8.00 ते सायं. 4.00

5) मतमोजणी – 1 जुलै 2024

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा