राष्ट्रीय छात्र सैनिकांनी स्वच्छता मोहीम करून १२० वृक्षांची केली लागवड.
जामखेड प्रतिनिधी
“स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता”अभियान अंतर्गत . दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अ.नगर जामखेड विभाग व जामखेड नगर परिषदेच्या वतीने भव्य स्वच्छता जनजागृती रॅली, एक पेड मा के नाम उपक्रम अंतर्गत 120 झाडांचे वृक्षारोपण करून जामखेडचे ऐतिहासिक वास्तू नागेश्वर मंदिर परिसर व वैतरणा नदी परिसर स्वच्छता करण्यात आले.
या अभियान उद्घाटन प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, प्राचार्य डोंगरे एम एल ,प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य मडके बी.के,कॅप्टन गौतम केळकर ,सेकंड ऑफिसर अनिल देडे ,थर्ड ऑफिसर मयूर भोसले,सेवानिवृत्त जवान गोकुळ राऊत, संभाजी कोकाटे, महेश कवादे, ज्ञानेश्वर मिसाळ, आकाश सानप, मंगेश घोडेकर, आमेर शेख, लक्ष्मण माने,अभिजित भैसडे, प्रमोद टेकाळे, रज्जाक शेख ,प्रणित सदाफुले,राजू काझी, संजू खेत्रे, कृष्णा विर,संजीवन जाधव,तुषार केवडे, इतर जामखेड नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी,ग्रामस्थ ,शिक्षक ,एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एनसीसी रॅली तहसील कार्यालय- कोर्ट गल्ली- महादेव गल्ली -पेठ- संविधान स्तंभ- चौफुला – नागेश्वर मंदिर या मार्गाने काढण्यात आली.
नागेश्वर मंदिर रोड ते सारोळा रोड या ठिकाणी”एक पेड मा के नाम” उपक्रम अंतर्गत120 देशी झाडाचे राष्ट्रीय छात्र सैनिकांद्वारे वृक्षारोपण करण्यात आले.
जामखेड मधील ऐतिहासिक वस्तू नागेश्वर मंदिर परिसर व वैतरणा नदी परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
बी.एस.एफ. मधील सेवानिवृत्त जवान गोकुळ राऊत यांचा एनसीसीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगतात मुख्य अधिकारी अजय साळवे यांनी स्वच्छता हा उपक्रम निरंतर चालणारा उपक्रम असून सर्वांनी स्वच्छता उपक्रम मध्ये सहभाग घेऊन स्वच्छ जामखेड करण्याचा प्रयत्न करावा.सर्वांनी एक वृक्ष लागवड करून हरित जामखेड करण्यासाठी प्रयत्न करावा असे मनोगत व्यक्त केले. सतरा महाराष्ट्र एनसीसी बटालियन ने उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या उपक्रमात जामखेड महाविद्यालय, ल ना होशिंग विद्यालय व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय या एनसीसी युनिटने उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन गौतम केळकर, सूत्रसंचलन अनिल देडे, आभार प्रदर्शन मयुर भोसले यांनी मानले.
या उपक्रमाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग यांनी अभिनंदन केले.