सर्व सामान्यांच्या मनात बसलेल्या आमदारास कोणताही नेता पाडु शकत नाही :आ. रोहित पवार
जामखेड प्रतिनिधी
भाजपने जीएसटी च्या माध्यमातून जनतेचा खीसा कापला आहे सर्व वस्तूवर जीएस टी लावला आहे. आत्तापर्यंत जनतेची लुट केली आहे. भाजपच्या काळात देश हा आराजकतेकडे चालला आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज करुन उद्योगपतींचे पंचवीस लाख कोटी रुपये कर्जे माफ केली. यावेळी भाजपला चारशे पार निवडुन दिले तर भाजप संविधान बदलायला कमी करायचे नाही अशी घणाघाती टीका शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ काल दि १० रोजी सायंकाळी सात वाजता जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. याचवेळी जयंत पाटील बोलत होते. याचवेळी आ. रोहित पवार, आ. भास्कर जाधव, भुषणसिंह राजे होळकर, निलेश कराळे मास्तर, काॅंग्रेसचे मुंढे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, पंचायत समितीच्या मा. सभापती राजश्री मोरे, संजय वराट, सुर्यकांत मोरे, चंद्रकांत राळेभात, सुनील लोंढे, राहुल उगले, रमेश आजबे, नय्युम शेख, हरिभाऊ आजबे, आण्णासाहेब सावंत, राजेंद्र पवार, सुरेश भोसले, वैजिनाथ पोले, हर्षल डोके, कविता महात्रे, अंजली ढेपे, रोहिणी गोलेकर, उमर कुरेशी, राजेंद्र गोरे, जावेद सय्यद, संतोष नवलाखा, प्रशांत राळेभात, आमित जाधव, प्रकाश सदाफुले, आमर चाऊस, युवराज उगले, वसीम सय्यद, गणेश हगवणे,शरद शिंदे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, रामहरी गोपाळघरे, मोहन पवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, निलेश लंकेंचा विजय लोकशाही व संविधानाचा विजय असणार आहे. मोदींकडे विकासाचा मुद्दा नाही म्हणून भावनिक मुद्दे पुढे करतात पुलवामा हल्ल्यात आपले 42 जवान नाहक मारले गेले. देशावर शोककळा असताना पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त होते. आपणास भावनिक राजकारण करून दोन वेळा गंडवले आहे. आपले पक्ष फोडणाऱ्यांना जनता कदापी माफ करणार नाही मोदी सरकार चारशोपार नाही तर तडीपार होणार आहे, असा घणाघातही जाधव यांनी केला.
आ. रोहित पवार बोलताना म्हणाले की कर्जत च्या सभेत अजित पवार म्हणाले मी कर्जत जामखेड साठी नीधी दिला मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे व कॉंग्रेस पक्षाने सहकार्य केले त्यामुळे खरा नीधी मिळाला आहे. विखे वर नाराज असणारे प्रा. राम शिंदे प्रवरेवरून खाऊ आल्यावर विखे चा प्रचार करू लागले. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माझ्या विरोधातील वक्तव्यास अजित दादांनी चूना लावला. कोरोना काळात जनतेला धीर देण्याऐवजी शिंदे यांना बंगल्यातील झाडे महत्त्वाची वाटली. राम शिंदे म्हणाले की संघर्ष यात्रा काढली पण रोहीत पवार यांचे वजन दोन कीलोंनी वाढले यावर उत्तर देताना आ. रोहित पवार म्हणाले की वजन वाढले आहे पण सामान्य जनतेमध्ये माझे वजन वाढले आहे .
राम शिंदे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते माझ्या समोर उभेच राहू शकणार नाहीत. माझे काम जनतेच्या हृदयात आहे. त्यामुळे माझा पराभव त्यांना शक्य नाही, असेही ते म्हणाले.