जामखेड प्रतिनिधी
सर्वस्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या प्रेरणेतून व गटशिक्षणाधिकारी
बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्याच्या वाढत्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून जवाहर नवोदय विद्यालयाच्या पात्रता परिक्षेत तालुक्यातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत आपला प्रवेश निश्चित केला आहे. नगर जिल्ह्यात प्रवेश पात्र एकुण ८० विद्यार्थ्यांपैकी जामखेड तालुक्यातील ९ विद्यार्थी म्हणजे एकुण १० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थांची निवड झाली आहे.
जामखेड तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी, गटअधिकारी प्रकाश पोळ गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व मार्गदर्शक शिक्षिका यांचे तालुक्यातील शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन होत आहे.
१) सायली रामहरी जगताप, २) आदित्य अभिमान घोडेस्वार, ३) शौर्य विकास हजारे, ४) अर्णव सुभाष ओमासे, ५) अर्णव चंद्रकांत गाडेकर, ६) शौर्य ब्रह्मदेव हजारे, ७) उत्कर्ष रामेश्वर ढवळे, ८) शिवसंस्कार दशरथ विरंगळ, ९) सोहम रामनाथ ढाकणे.