जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन संस्थेच्या नोडल ऑफिसर जोत्स्ना बुधगावकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात उद्या दिनांक 30/03/2024 रोजी सकाळी १० वाजले पासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन विद्यार्थी व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व विद्यार्थी व जामखेड मधील नागरिक आपणास निवेदन करतोत की गेल्या काही दिवसापासून रत्नदीप मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शारीरिक मानसिक व आर्थिक छळवणूकी विरोधात आंदोलन चालू होते या आंदोलनादरम्यान सर्व सरकारी संस्था संबंधित विद्यापीठांनी नोडल ऑफिसर चे नेमणूक करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली होती.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेने देखील सौ जोत्स्ना बुधगावकर यांची नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नेमणूक करण्यात आली होती त्या वेळोवेळी जामखेड येथे येऊन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी संस्थेची आर्थिक तोडजोडी केल्याचा संशय आहे व त्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांची पिळवणूक करत आहेत तरी सौ जोत्स्ना बुधगावकर यांची नोडल ऑफिसर पदावरून नियुक्ती रद्द करून दुसऱ्या न्याय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा उद्या दिनांक 30 3 2024 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जामखेड येथील खर्डा चौकामध्ये सर्व विद्यार्थी व जामखेड मधील नागरिक सामुदायिक रित्या बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहेत यावेळी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सौ जोत्स्ना बुधगावकर यांना जबाबदार धरण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड आण्णासाहेब सावंत, शिवपरतिष्ठानचे पांडूराजे भोसले , मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ, सर्व पक्ष, संघटना व समस्त जामखेडचे नागरीक तसेच विद्यार्थी रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार आहेत.