चौंडीत वृध्द महीलेचे घर जळुन खाक, गॅस टाकीचा झाला स्फोट

- Advertisement -spot_img

गावातील तरुणांनी आर्थिक मदत गोळा करून केली वृध्द महीलेस मदत

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील चौंडी येथिल देवकरवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वृद्ध महीलेच्या घराला आग लागल्याने संपुर्ण घर जळुन खाक झाले. यावेळी घरातील आसलेल्या गॅस टाकीचा देखील स्फोट झाला. मात्र या घटनेत जीवित हानी झाली नाही. यावृद्ध आणि निराधार महीलेला गावातीलच तरुणांनी आर्थिक मदत गोळा करून एक माणुसकीचे नात जपले.

या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील चौंडी येथे देवकरवाडी रस्त्याच्या लगत निराधार आसलेल्या वृध्द महीला जलसाबाई किसन समुद्र या रहात आहे. त्या निराधार आसल्याने मजुरी करुन आपली उपजीविका भागवतात. तीन दिवसांपुर्वी म्हणजे दि २२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या घरात काम करत आसताना त्यांना अचानक घरात धुर झालेला दिसला त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान राखून घराच्या बाहेर पडल्या. मात्र त्यांचे घर लाकडी छपराचे असल्याने काही क्षणातच घर जळुन खाक झाले. यावेळी यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा देखील स्फोट झाला व गॅसची टाकी फुटून टाकीचे तुकडे परीसरात विखुरले होते.

या आगीत घरातील धान्य, ज्वारी, पैसे व कपडे यासह इतर वस्तू जळून खाक झाल्या, स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज साऱ्या गावभर ऐकू गेला, त्यामुळे गाव भर एकच चर्चा सुरू झाली जेंव्हा गावकऱ्यांना ही घटना समजली तेंव्हा घटनास्थळाकडे धाव घेतली.

हातावर पोट भरणाऱ्या वृध्द महीला या रडून – रडून पुरत्या गहाळ झाल्या, ज्यावेळी काबाड कष्ट करून पै-पै जमवून भविष्यासाठी, उद्यासाठी रक्कम, धान्य जमवून ठेवलेलं होत ते एका क्षणात होत्याचं नव्हत झालं ते पाहून गावातील काही तरुण हवालदिल झाले व त्यांनी या वृद्ध महीलेस काही आर्थिक मदत करायचे ठरवले. गावातील तरुणांनी आर्थिक मदत गोळा करुन सदरची रक्कम वृध्द महीलेच्या हातात स्वाधीन केली. त्यावेळी विजय भांडवलकर अध्यक्ष शेतकरी संघटना, चोंडी, संकेत देवकर, तसेच शरद शिंदे यांनी घरी जाऊन मदत दिली त्यावेळी त्यांनी धान्य व इतर काही गरज सुध्दा लागली तर सांगा असे मदतीचे आश्वासन दिले.

चौकट.

वृध्द महीलेस आनखी मदतीची गरज

चौंडी येथिल वृध्द महीला जलसाबाई समुद्र यांच्या घरातील सर्व सामान जळुन खाक झाल्याने त्यांना आनखी मदतीची गरज आहे. चौंडी गावातील तरुण मदतीसाठी धावले आसले तरी इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी देखील या वृध्द महीलेस मदतीसाठी पुढे आले पाहिजे आशी मागणी चौंडी येथिल तरुणांकडून होत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा