नवरात्रीच्या निमित्ताने नगर सेवक बिभीषण धनवडे यांच्या वतीने महिला भगिनींना मोहटादेवी दर्शन.

- Advertisement -spot_img

शहरातील सदाफुले वस्ती येथे जगदंबा देवी मंदिर या ठिकाणी नवरात्रीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी
नवरात्रीच्या पुण्य काळात देवीची उपासना केली जाते विशेषता महिला भगिनी देवीची पुजापाठ करून नवरात्रीचे उपवास करत आसतात व या पर्व काळात या भाविक भक्त महिलांना देविचे दर्शन घेता यावे या हेतूने नगर सेवक बिभीषण धनवडे हे गेल्या एकवीस वर्षापासून नवरात्र उत्सवामध्ये जामखेडमधील महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून आणतात याही वर्षी सुमारे पंचवीस क्रुझर गाड्याचा ताफा सुमारे 250 ते 300  माता भगिनींना घेऊन मोहटादेवी दर्शनाला रवाना झाला यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते.

यावेळी नगरसेवक बिभीषण धनवडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, काकासाहेब कोल्हे, मनोज भोरे, संदीप गायकवाड, सुग्रीव सांगळे, गणेश हागवणे, प्रकाश काळे, उमर कुरेशी, पिंटू इंगोले, अमोल बहिर, विशाल वराट यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते.

नगरसेवक बिभीषण धनवडे हे नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम राबवतात यातील एक दिवस प्रभागातील महिलांना घेऊन मोहटादेवीचे दर्शन घडवितात आज सकाळी सुमारे 250 ते 300 माता भगिनींना घेत दहा वाजता पंचायत समिती समोरून पंचवीस क्रुझर गाड्याचा ताफा रवाना झाला. यावेळी माता भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

सदाफुले वस्तीवर बिभीषण धनवडे यांच्या वतीने जगदंबा देवीचे मंदीर उभारणीचे काम सुरू आहे. लवकरच तेही काम पूर्ण होईल असे धनवडे यांनी सांगितले.

बिभीषण धनवडे यांनी नुकताच भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपला उपक्रम सुरू ठेवला आहे.

बिभीषण धनवडे हे दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. जगदंबा महीला मंडळासह सर्वाना वर्षभर देवीची सेवा करण्यासाठी मंदिराचे बांधकाम सुरू आहे लवकरच बांधकाम पूर्ण होईल.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा