जि . प . प्रा . केंद्र शाळा पाटोदा ता . जामखेड येथील एक मूल एक झाड उपक्रम स्तुत्य- प्रमोद ( दादा ) मोरे

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

पाटोदा शाळेत एक मूल एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला . याप्रसंगी मार्गदर्शन करताना निसर्ग व सामाजिक पर्यावरण पदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद ( दादा ) मोरे यांनी शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतूक केले .  उत्तम पवार सरांनी स्वय खर्चाने झाडे आणून त्याचे संर्वधन केले आहे . शाळा निर्सगरम्य व हिरवीगार केली आहे . आज शाळेत जवळपास 250 झाडे आहेत शाळेतील विदयार्थ्यासाठी आनंदीमय वातावरण शाळेत आहे . ते म्हणाले पर्यावरण संवर्धनाची प्रत्येक भारतीयाची जबबादारी आहे . जर पर्यावरणाचे संवर्धन केले नाही तर येणाऱ्या पिढी साठी उष्माघाताचे संकट अटळ आहे . वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे . आमच्या मंडळा तर्फे राज्यभर त्या संदर्भात जनजागृती केली जाते . मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वाटप केले जाते .
या कार्यक्रमाला पाटोदा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री रामराव निकम उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्याना वृक्षाचे महत्व पटवून दिले . तसेच प्रत्येक विदयार्थ्यानी आपल्या परिसरात दिलेल्या रोपाचे वृक्षारोपण करून संवर्धन करावे असे सांगितले . यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती छायाताई राजपूत , जिल्हाध्यक्षा श्रीमती लतिकाताई पवार , स्नेहल  कौशल्ये यांनीही मनोगत व्यक्त करून वृक्षरोपण काळाची गरज आहे असे सांगितले .
   सर्वप्रथम गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली . त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्याना वृक्षाचे वाटप करण्यात आले . यावेळी श्री रामेश्वर चेमटे , श्री मोहन खवळे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अयुब पठाण होते .
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री उत्तम पवार यांनी केले . शाळेत एक मूल एक झाड हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविला जातो असे त्यांनी सांगितले . सुत्रसंचालन संगीता राठोड यांनी  केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता जोगदंड , सुलभा हजारे व अश्विनी कुमटेकर यांनी परिश्रम घेतले .

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा