शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात २५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

- Advertisement -spot_img

जामखेडकरांनी शिवराज्याभिषेक सोहळा रक्तदानसारखा सामाजिक उपक्रम जपत केला साजरा.

जामखेड प्रतिनिधी

श्री शिवराज्याभिषेक उत्सव सोहळ्यानिमित्त श्री शिवराज्याभिषभाऊ समितीतर्फे विविध  कार्यक्रमांचे आयोजन दिनांक १७ जून पासून सुरू आहेत त्याप्रमाणे  दिनांक १९ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे स. ९ ते ५ वा. या वेळेत तहसील कार्यालय या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 255 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून छत्रपती शिवरायांप्रती कर्तव्य पार पाडले.

   गेली आनेक वर्षे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व शिवप्रेमी जामखेड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करत आहेत चारदिवसींय सोहळ्यात आनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते
याचाच एक भाग म्हणजे “भव्य रक्तदान शिबिर” रक्तदान ही काळाची गरज आहे रक्ताची निर्मिती कोण्या कारखान्यात होत नाही ती मानवीशरीरच करू शकते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्यजिवन हे धावपळीचे झाले आहे त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा सामान करावा लागतो तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे त्यामुळे प्रत्येक हाॅस्पीटल मध्ये रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यामुळे प्रत्येक सशक्त नागरिकांनी रक्तदान करावे त्यासाठी शिवराज्याभिषेक उत्सव समिती दरवर्षी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत आहे.
    तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत प्रजेचे हित ही भावना प्रत्येक युवकांच्या मनामनात रूजावी म्हणून आशा उपक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे.
याच उद्देशाने शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरास जामखेडकरांनी मोठा प्रतिसाद दिला शिबिर संपन्नतेसाठी शिवराज्याभिषेक सोहळा समीतीच्या सर्व सदस्यांनी व शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा