शिस्त आणि सततचे प्रयत्न यश मिळवून देतात : गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

शिवनेरी अकॅडमी येथे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी बरोबर 6 वा. साकत फाटा येथे जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून धावणे स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवनेरी अकॅडमीचे सर्वेसर्वा कॅप्टन लक्ष्मण भोरे मेजर,नागरगोजे मेजर, कवादे मेजर, आदर्श शिक्षक मुकुंदराज सातपुते,एकनाथ(दादा)चव्हाण, राजीव मडके,सुनिलमामा भामुद्रे,विजय चव्हाण,तुपसुंदरनाना इ.मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत वनवे (वन-वे) नावाच्या विद्यार्थांने वन क्रमांक पटकावला.यानंतर शिवनेरी अकॅडमी कॅम्पसमध्ये स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम बक्षीस वितरण समारंभ, नवीनच भरती झालेल्यांचा सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब धनवे साहेब बोलत होते.साहेबांनी स्वतःच्या जीवनातील उदाहरणे देवून अकॅडमीतील विद्यार्थ्यांना यशाचा गुरूमंत्र दिला.तेथील विद्यार्थ्यांना तो मंत्र मनापासून भावला.मा.धनवे साहेबां चे जामखेड तालुक्यातील शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना अगोदरच माहित होते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे साहेबाबरोबर फोटो काढणे असो की त्यांचे विचार ऐकणे असो त्यांचा आानंद चेहऱ्यावर दिसून येत होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन लक्ष्मण भोरे मेजरसाहेब यांनी केले.त्यांनी शिवनेरी अकॅडमीची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल त्याच बरोबर अकॅडमीत चालू असलेले उपक्रमांची माहिती दिली. त्यांचा कमवा व शिका हा उपक्रम राबविल्यामुळे अनेक गरिब विद्यार्थी प्रशिक्षण घेवून भरती झाल्याचे सांगितले. पहाटे 5वा.नागरगोजे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणारी हार्ड कसरत त्याच बरोबर अकॅडमीत स्पर्धात्मक शिकवला जाणारा अभ्यासक्रम याची माहिती कॅप्टन भोरे मेजर यांनी दिली. यावेळी  एकनाथ(दादा)चव्हाण,मुकुंदराज सातपुते त्याच बरोबर विश्वविक्रमवीर अराध्य नागरगोजे यांचे जोशपूर्ण मनोगत झाले. अराध्य परशराम नागरगोजे याचा वडिल परशराम नागरगोजे यांच्या सह सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढेपे मेजर यांनी केले. कवादे मेजर, शेळके मेजर, राजीव मडके,सुनिलमामा भामुद्रे, विजय चव्हाण, तुपसुंदर सर,परशराम नागरगोजे इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांचे खास वैशिष्ट्य म्हणजे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेबांचे खास आकर्षण विद्यार्थ्यांना होते.
कार्यकमाचे आभार कॅप्टन भोरे मेजर साहेब यांनी मानले. एक सुंदर कार्यक्रम रात्री भरपूर पाऊस झाला असतांनाही घेणे हे फक्त फौजीच करू शकतात. देशाचा सैनिक कधी आजीमाजी सैनिक नसतो तर तो नेहमी सैनिकच असतो. याचा प्रत्यय जामखेड त्रिदल मेजर कडे पाहिल्यानंतर लक्षात येते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा