जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा जामखेड येथे उत्साहात संपन्न

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथे रविवारी दि. 14 जुलै रोजी अहमदनगर जिल्हा कॅडेट, ज्युनियर व सिनिअर तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडल्या अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जामखेड येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात सकाळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, विश्वदर्शन नेटवर्कचे गुलाब जांभळे, संत गोरा कुंभार पतसंस्थेचे अध्यक्ष विनायक राऊत, अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंढे व रविंद्र शिर्के उपस्थित होते. यावेळी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव संतोष बारगजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

भारतीय तायक्वांदो महासंघाच्या ( टीएफआय) नियमानुसार या स्पर्धा मॅट वर घेण्यात आल्या
यावर्षी कॅडेट, ज्युनियर व सिनिअर या तिनही गटातील मुले व मुलींच्या एकत्रित जिल्हा स्पर्धा जामखेड येथे घेण्यात आल्या.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (मुंबई) मान्यतेने महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धा, चंद्रपूर येथे दिनांक 19 ते 21 जुलै 2024 दरम्यान होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा, बीड येथे दिनांक 25 ते 27 जुलै 2024 रोजी होणार आहे.

जामखेड येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील प्रत्येक वजन गटातील विजेत खेळाडूंची बीड व चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दिवसभर मोठ्या उत्साहात चाललेल्या स्पर्धेचा सायंकाळी आठ वाजता जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण बांगर सहसचिव अल्ताफ कडकाले. दत्तात्रय उदारे, संजय बेरड, श्रीमती इंदुबाई बारगजे, आनंद राजगुरू, जगन्नाथ धर्माधिकारी, संतोष राळेभात पाटील, मिठूलाल नवलाखा, संजय वारभोग, धनराज पवार उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शकील सय्यद अंबादास साठे , सुरेश वाघ, सचिन आगळे, दिनेशसिंग राजपूत, गोरक्षनाथ गालम, महेश मुरादे, बाबासाहेब क्षिरसागर, लक्ष्मण शिंदे, रवि यादव, गणेश धिवर, शाम ब्राम्हणे यांच्यासह खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा