हाडाचा ठिसूळपणा व कॅल्शियम तपासणीत 450 रुग्णांची केली तपासणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील सहारा हॉस्पिटल आय. सी. यु व शितवल्कल फार्मास्युटिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने हाडांचा ठिसूळपणा व कॅल्शियम तपासणी शिबिर सहारा हॉस्पिटल याठिकाणी संपन्न झाले या शिबिरात साडेचारशे रुग्णांनी तपासणी करून लाभ घेतला.
सहारा हॉस्पिटल येथे संपन्न झालेल्या शिबिरात रुग्णांची ऑस्टिओपोरोसिस मशिनवर हाडांचा ठिसूळपणा व कॅल्शियमचे प्रमाण चेक करुन रुग्णांना योग्य ती औषध उपचार करण्यात आले. तसेच कंबर दुखी, ताठणे, मान दुखणे, खांदा, खुबा, मणक्यात वेदना जाणवनणे, गुडघेदुखी व टाच दुखी यारुग्णांची देखील तपासणी करण्यात आली. पंधरा दिवस चाललेल्या या शिबिरात 450 रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन सहारा हॉस्पिटल चे संचालक मनोज शिंदे, डॉ. सुनील हजारे , डॉ. चंद्रकांत मोरे डॉ. सचिन काकडे डॉ. दादासाहेब सावंत व व्यवस्थापक जयसिंग उगले यांनी केले होते. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी तुकाराम डोंगरे महादेव होवाळ संतोष मापारी संभाजी थोरात महेंद्र कापडी डॉ. संदिप त्रिंबकेसर व डॉ. किरण रणदिवे यांनी खास परीश्रम घेतले.
जामखेड येथील बस स्थानका जवळ आसलेल्या सहारा हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभाग, ह्रदयरोग व मधुमेह उपचार, विष बाधा, सर्पदंश, अस्थिरोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग, व स्त्रीरोग विभाग सह विविध उपचार सुविधा उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी वेळोवेळी रुग्णांसाठी मोफत तपासणी व अल्पदरात उपचार शिबीराचे आयोजन करण्यात येते.