शासनाच्या विविध योजनांसाठी ई प्रणालीचा वापर सर्वांनी करावा – तहसीलदार गणेश माळी

- Advertisement -spot_img

युवा संवाद उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कागदपत्र अडचणी सोडवणार – तहसीलदार गणेश माळी

जामखेड तहसील महसूल विभाग अंतर्गत १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान “महसूल पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. या “महसूल पंधरवडा २०२४” निमित्त “युवा संवाद” उपक्रम रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात संपन्न झाला.


युवा संवाद उपक्रमाचे उद्घाटन जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांचे हस्ते झाले तर अध्यक्ष प्राचार्य मडके बी के होते. प्रमुख उपस्थिती मंडल अधिकारी प्रशांत माने ,नायब तहसीलदार मनोज भोसेकर, समाज कल्याण वस्तीगृह अधीक्षक गर्जे , मुख्याध्यापिका चौधरी के डी ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, तलाठी विश्वजीत चौगुले, महसुल सहाय्यक सचिन आगे , विनोद सासवडकर, गोपाळ बाबर,पाटोळे सर,लोंढे मॅडम, मुसळे मॅडम,नरसाळे मॅडम , गोपालघरे जे बी,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले,आदी मान्यवर व नागेश विद्यालय, ज्यूनियर कॉलेज व कन्या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते
यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी करावा.
सर्वसामान्य घटकापर्यंत ई प्रणालीचा वापर जास्तीत जास्त करण्यासाठी सर्वांनी जनजागृती करावी असे आव्हान तहसीलदार यांनी केले. तसेच विविध कागदपत्रांची
रोजगारासाठी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वार्षिक अवधिास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-
क्रिमिलेअर प्रमाणपत्र ,
राज्यातील विविध घटकातील लाभार्थी विद्यार्थ्यांना केंद्र , राज्य शासनाद्वारे येणाऱ्या
विविध विविध शिष्यवृत्ती ची माहिती दिली.
जात प्रमाणपत्र आधार कार्ड दुरुस्ती या संदर्भात मार्गदर्शन केले .दहावी व बारावी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय ,औषध निर्मिती शास्त्र व इतर क्षेत्रातील कोर्स साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती पत्रक यावेळी प्रसिद्ध करण्यात आले.
विद्यार्थ्यांना कागदपत्रात संदर्भात कोणती अडचण असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आम्ही त्या अडचणी दूर करण्यासाठी तत्पर आहोत असे मनोगत तहसीलदार गणेश माळी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मडके बी के यांनी विद्यार्थ्यांनी कागदपत्र कागदपत्र अद्यावत ठेवावे व विविध शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.
कार्यक्रम नियोजनासाठी एनसीसी विभागाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन प्रा विनोद सासवडकर यांनी केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा