जामखेडचा प्रारुप विकास आराखडा रद्द झाला नाही, जनतेची दिशाभूल करुन श्रेय घेण्याचा विरोधाकांचा प्रयत्न – रमेश (दादा) आजबे.

- Advertisement -spot_img

जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पत्रकार परिषद संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन नागरीकांचा विरोध असणारा जामखेड विकास आराखडा रद्द झाला आशी माहिती दिली. मात्र जामखेड विकास आराखडा हा रद्द झाला नसून त्या बाबत शासनाने काढलेल्या पत्रात रद्द केला असा कुठे उल्लेखच नाही. तसेच समितीमध्ये भाजप प्रेरित लोकांनी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन जनतेची दिशाभूल करुन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. आसा असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

दोन दिवसांपूर्वी जामखेड बचाव कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जामखेडचा विकास आराखडा रद्द झाला आशी माहिती दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन सखोल विश्लेषण केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सांगितले की दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत जवळ जवळ भाजप प्रेरित लोक जास्त दिसुन येत होते. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील नागरीक व व्यापार्‍यांची दिशाभूल केली आहे. शासनाने काढलेल्या पत्रात विकास आराखडा रद्द झाला आसा कुठेच उल्लेख नाही. निवडणुकीच्या तोंडावर केवळ श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांचा फसला आहे. विकास आराखडा रद्द करु नका आसे आम्ही म्हणत नाही तसेच नगरपरिषद निवडणुक झाल्यावर आमची राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर सर्व नागरीक व व्यापार्‍यांना विश्वासात घेऊन कोणाचे नुकसान होणार नाही असा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

आ. प्रा राम शिंदे यांचा भाजपच्या लोकांनी विकास आराखडा रद्द झाला म्हणून बॅनरबाजी करत त्यांचा नुकत्याच सत्कार ठेवला मात्र विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून व जनतेची दिशाभूल करुन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप कडुन होत आहे असा देखील आरोप रमेश आजबे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

शहरातील मोठे बिल्डर गुगळे, फिरोदिया व शिंदे यांच्या फायद्यासाठी डीपी प्लॅन बनवण्यात आलेला आहे. कोणाच्या सांगण्यावरून बनवला याची चौकशी होणे आवश्यक आहे. या डीपी प्लॅन विरोधात कोर्टात जो खर्च होईल तो स्वतः आमदार रोहित पवार करणार होते. मात्र आ. रोहित पवार यांच्या बाबत भाजपच्या लोकांनी संभ्रम निर्माण केला. त्यामुळे बचाव कृती समितीच्या वतीने वर्गणी गोळा करण्यात आली व जनतेची दिशाभूल केली आहे.

यानंतर राजेंद्र कोठारी यांनी बोलताना सांगितले की विकास आराखडा रद्द झाला याचा मोठा गवगवा झाला. मात्र हा आराखडा रद्द झाला नाही. खरंच विकास आराखडा रद्द झाला का याची माहिती आम्ही तज्ञ वकील व अधिकार्‍यांन कडुन घेतली असता विकास आराखडा रद्द झाला आसा कुठे उल्लेख नाही याची माहिती मिळाली व त्यामुळेच आम्ही आज पत्रकार परिषदेत घेऊन खात्रीलायक माहिती पत्रकारांना दिली आहे.

यावेळी शहाजी काका राळेभात, प्रशांत राळेभात, व अमोल गिरमे यांनी दिखेल पत्रकार परिषद घेऊन विकास आराखडा रद्द झाला नाही आशी माहिती दिली. पत्रकार परिषदे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेंद्र कोठारी, रमेश (दादा) आजबे, अमोल गिरमे, शहाजी (काका) राळेभात प्रशांत (काका) राळेभात, राजेंद्र पवार, उमर कुरेशी वसीम सय्यद मंडप, प्रकाश काळे राजेंद्र गोरे, गणेश घायतडक सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार ॲड हर्षल डोके मानले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा