सोमवारी मुंबई भाजपा कार्यालयात होणार आहे पक्ष प्रवेश.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जेष्ठ नेते गोरगरिबांच्या हाकेला धावुन जाणारे लहान थोरांमध्ये (आबा) नावाने ओळखले जाणारे नेते गेली आनेक वर्षे राजकारणात सक्रिय आसुन मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आसणारा नेता म्हणून प्रा. मधुकर आबा राळेभात यांची ओळख आहे.
गेली आनेक वर्षे प्रा. राळेभात यांनी प्रथमता शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये आनेक पदांवर काम केले परंतु गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीला विरोध केला परंतु पक्षांने त्या विरोधाची दखल घेतली नाही आ. रोहित पवार यांच्याकडून सन्मान दुखावल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला मतदार संघातील कार्यकर्तेंशी चर्चा करत आखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे
प्रा. मधुकर राळेभात यांचा मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी दि 23 रोजी दुपारी दोन वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री तसेच महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भुपेंद्रजी यादव, महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर पक्षप्रवेश होत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना आमदार करण्यासाठी ज्या नेत्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांमधील सर्वाधिक जनाधार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात आहेत
दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासमवेत जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात व काही ठराविक महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मध्यरात्री झालेल्या या बैठकीत प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भाजप प्रवेश निश्चित झाले प्रा राळेभात सोमवारी २३ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत.
जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात हे जामखेडच्या राजकारणातील महत्वाचे मोठे नेते आहेत. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सतत जनतेत
रमणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या सारखा महत्वाचा जेष्ठ नेता भारतीय जनता पार्टीत आल्याने भाजपला याचा मोठा राजकीय फायदा होणार आहे. तर रोहित पवारांच्या अडचणीत मोठीवाढ होणार आहे.