महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर प्रथमच गावखेड्यात राज्यमंत्री मंडळाची बैठक होत आहे संपन्न:सभापती प्रा.राम शिंदे

- Advertisement -spot_img

६ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक; 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल निश्चित


 जामखेड प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी येत्या 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक बैठकीसाठी 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल ठरवण्यात आला असून, प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे.


या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि अन्य नियोजन सुसुत्रपणे पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
यावेळी बोलताना सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे मंत्री परिषदेची बैठक होत आहे यासाठी प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे

महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर अशी बैठक एका छोट्या गावात होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उत्तम प्रशासक होत्या त्यांच्या विचारांचा वारसा हे सरकार चालवत आहे त्यामुळेच या मंत्री मंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहे
येत्या ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सवही मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या जयंती निमित्ताने शासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्याबाबतचा निर्णय मंत्री परिषदेच्या बैठकीत घेतला जाईल
      त्यामुळे या बैठकीचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यासाठी व तयारीचा आढावा घेण्यासंदर्भात आजची आढावा बैठक घेण्यात आली आसे सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा