जामखेड तहसील कार्यालयात पुरवठा विभागात जेष्ठ नागरिकांची हेळसांड

- Advertisement -spot_img

दोन दिवसात रेशनकार्ड धारकांची प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करणार :सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील पुरवठा विभागात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला या पुरवठा विभागात हेलपाटे मारून झाले हैराण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून यापुरवठा विभागात नविन रेशन कार्ड ऑनलाइन करणे, विवाहित मुलीचे नाव कमी करणे, नवीन विवाहित सुनांचे नाव ॲड करणे, तसेच मयताचे नाव कमी करणे, धान्य मिळवण्यासाठी कुपन ऑनलाईन करणे यासाठी नागरिक पुरवठा विभागात हेलपाटे मारत आहेत. यासर्व गोष्टी ऑनलाइन करण्यासाठी  दररोज तहसील कार्यालयातील जेष्ठ नागरिक देखील पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत.

याठिकाणी सक्षम अधिकारी नसल्याने पुरवठा विभागाचा बोजवारा उडाला आहे. तसेच याठिकाणी शासनाने टेंडर पद्धतीने नेमणूक केलेल्या ऑनलाईन करणारे युवा कर्मचारी हे नागरिकांना अरेरावेची भाषा वापर करतात, ज्येष्ठ नागरिकांना अरे तुरेची भाषा वापरतात असं नागरिकांनी बोलताना सांगितले आहे. यासर्व गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी काल दि 22 रोजी सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांना आवाज उठवला आहे. या नागरिकांना घेऊन त्यांनी तहसील कार्यालयासमोर या सर्व प्रश्नांबाबत जाब विचारला या ठिकाणी दिलेले सर्व अर्ज अस्ताव्यस्त पडलेले असून एक वर्षांपूर्वी दिलेले अर्ज त्याचाही अद्याप शोध लागत नाही यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.

या पुरवठा विभागात येणाऱ्या जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची जर ससे हेलपट थांबली नाही तर येत्या दोन दिवसात तालुक्यातील सर्व नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत तालुक्यातील बहुसंख्य नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा