जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी.

- Advertisement -spot_img

देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली नमाज पठन झाल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना झाली तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी केली.जामखेड येथे रात्री पाऊस आसल्यामुळे ईदगाह मैदानावर नमाज पठन झाले नाही . तालुक्यातील व शहरातील मस्जिद येथे सकाळी साडेनऊ वाजता ईदची नमाज पठन झाले . जामखेड तालुका व शहरातील अल करीम मज्जीद,मोहम्मदिया कुरेशी मज्जीद,निजमिया मज्जीद,आयेशा मज्जीद,अलिम मर मस्जिद , आरणगाव,मोगलपूर मज्जीद,मक्का मस्जिद पाटोदा,जुम्मा मज्जीद,आक्स मज्जीद,ताज मज्जीद,आक्स मस्जिद फक्रबाद, मक्का मस्जिद हळगाव, जामा मस्जिद नान्नज या मस्जिदमध्ये तालुक्यातील मैलाना मुफ्ती अफजल कासमी साद हफी साहब,खलील अहेमद कुरेशी,अल्ताफ आतर,साजिद पठाण,तोहेब जकीर काझी,हाफिज इमामुद्दीन,सय्यद इसाक,ताहेर खान,तारी साब,नसीम हाजी,अर्षद शेख, मुफ्ती सलीम पठाण या सर्व धर्मगुरुनी प्रत्येक मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवांचे बकरीद ईदचे नमाज पठन केले. यावेळी तालुक्यातील व शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात शांतता समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून तालुक्यात व शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मस्जिदी बाहेर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाजानंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकड खरेदी-विक्रीत तालुक्यात लाखो रुपयांची उलाढाल झाली. तालुक्यात विविध ठिकाणच्या आठवडे बाजारात बोकडांची खरेदी विक्री सुरूहोती. बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांच्या किंमतीमध्ये यावर्षी मोठी वाढ दिसून आली. बकरी ईदनिमित्त तीन दिवस म्हणजे सोमवारपासून बुधवारपर्यंत घरोघरी कुर्बानी केली जाणार आहे. सोशल मीडियावर सर्व हिंदु बांधवांनी मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छां दिल्या .

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा