हळगाव कारखान्याने या वर्षी
साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले.
जामखेड प्रतिनिधी
बारामती ॲग्रोच्या जय श्रीराम शुगर साखर कारखाना हळगावने साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे . पुढील वर्षी हे उसाचे गाळप दहा लाख मेट्रिक टन करण्याचा संकल्प या साखर कारखान्याने केला आहे. असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष (आबा) गुळवे यांनी गळीत हंगाम सांगता दरम्यान सांगितले.
आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट नंबर तीन गाळप हंगाम २०२३-२४ सांगता कार्यक्रम समारंभ गुरवार दि २८ रोजी संपन्न झाला. यावेळी बारामती ॲग्रो चे व्हा. चेअरमन सुभाष (आबा) गुळवे, व्हाईस प्रेसिडेंट के.एन. निंबे, मिलिंद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुधीर राळेभात, कैलास वराट, मदन लेकूरवाळे, माजी सभापती दीपक पवार पाटील, सुरेश भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राऊत, नारायण जायभाय, विठ्ठल चव्हाण, सुंदरदास बिरंगळ, संतोष निरगुडे,सरपंच सुनिल उबाळे, सुशेन ढवळे, अमर चाऊस, सह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना गुळवे म्हणाले की जय श्रीराम साखर कारखाना हळगाव चे ऊस गाळप चे प्रमाण कमी होते. मात्र कर्जत जामखेड चे आ.रोहित पवार यांच्याकडे हा कारखाना आल्याने शेतकर्यांनी कारखान्यावर विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणात ऊस घातला या वर्षी बारामती ॲग्रोचा शेटफळ येथील कारखाना महाराष्ट्रात सर्वात जास्त गाळप करणारा कारखाना ठरला. यावर्षी हळगाव येथील बारामती ॲग्रोच्या जय श्रीराम शुगर युनियन नंबर तीन या साखर कारखान्यात ३ लाख ५२ हजार ८०० मॅट्रिक टन उसाची गाळप झाली आहे.या साखर कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला. आ. रोहित पवार हे ज्या भागाचे नेतृत्व करतात त्या भागातील तरुणांना रोजगार देण्याचे काम करतात.
कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात म्हणाले, की आ. रोहित पवार यांनी हा साखर कारखाना घेतल्या नंतर जामखेड सह परिसरातील शेतकर्यांच्या उसाचा प्रश्न सुटला आहे. माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी सांगितले, की मतदारसंघातील शेतकरयांच्या ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आ. रोहित पवार यांनी हळगाव येथील साखर कारखाना विकत घेतला आहे.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर म्हणाले की आ. रोहित पवार हे लढवय्ये आमदार आहेत. पहिल्याच आमदारकीच्या टर्म मध्ये ईडी चौकशी लावलेले देशातील पहिले आमदार आहेत. तरीही ते जनतेसाठी लढत आहेत. विधानपरिषदेवर नियुक्ती झालेले दुसरे हे रडके आमदार आहेत. रोहित पवार हे विकास कामांनी ओळखले जातात. त्यांचा विकास देखवत नाहीत म्हणून विरोधी आमदार विकास कामांना स्थगिती लावण्यात वेळ घालवता आ.रोहित पवार लढवय्ये तर त्यांना विरोध करणारे रडके आमदार आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केले. या नंतर संचालक सुधिर राळेभात, सुरेश भोसले यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार व्हाईस प्रेसिडेंट के. एन. निंबे यांनी मानले.