सुप्रसिद्ध व्याख्याते सावता हजारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश..

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

जवळा गावचे युवा नेते, उत्तम वक्ते, संघर्षशील नेतृत्व, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मा.सावता (भाऊ) हजारे यांनी देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेबव  आ. रोहित (दादा) पवार, मा. नामदेव (बाप्पु) राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज “गोविंदबाग” बारामती येथे प्रवेश केला.

सावता हजारे  हे जवळा ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून मागील काळात त्यांनी सामाजिक कामात मोठे योगदान दिलेले आहे. स्वराज्य दूध संघाच्या माध्यमातून गावातील व परिसरातील शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली आहे. तसेच महापुरुषांच्या वेगवेगळ्या जयंती – पुण्यतिथी कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करुन जिल्हाभरात नामवंत व्याख्याते म्हणुन त्यांनी नाव कमावलेले आहे.

आ. रोहित दादा पवार यांच्या विकास कामांनी प्रभावित होवून मा. सावता हजारे यांनी काम करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. याची दखल घेवून आ. रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब , तसेच कर्जत नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष मा. नामदेव (बप्पू) राऊत, राष्ट्रवादीचे जामखेड तालुका युवक कार्याध्यक्ष मा. अशोक पठाडे यांच्या उपस्थितीत बारामती येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.

पुढील काळात आ. रोहित दादा पवार यांच्याबरोबर तन – मन – धनाने काम करून पक्षाच्या विचारांचा प्रचार – प्रसार करण्याचा मानस यावेळी सावता हजारे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा